मुंबई -हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या तासात विधानसभेत विद्यापीठ सुधारणा विधेयकावरून रणकंदन माजले. विद्यापीठांचे बट्ट्याबोळ करण्याचं काम हे विधेयक करणार आहे, असे सांगून विरोधकांनी याला विरोध केला. मात्र, अखेर गदारोळातच हे विधेयक मंजूर झाले. तर विरोधकांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. ( University Reform Bill Passed in MH Assembly Winter Session 2021 )
विधेयक मजूर करण्यावर सरकार ठाम -
हे विधेयक मंजूर झाल्याने हे सरकारी महामंडळामध्ये परावर्तित होण्याची भीती आहे. या अगोदर २०१६ साली माशेलकर सरांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही सभागृहांची संयुक्त समिती तयार करून हे विधेयक तयार केले होते. मात्र, या सुधारणा विधेयकासाठी संयुक्त समिती तर सोडा मात्र, साधे मतसुद्धा विचारात घेण्यात आले नाही, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आम्ही या संदर्भामध्ये चर्चेची विनंती केली. मात्र, आजच विधेयक पूर्ण जोमाने मंजूर करण्याचे अगोदर ठरल्याने आमचा विरोध चालला नाही. पहिल्यांदाच प्र कुलपती हे पद निर्माण केल्याने आता हे सर्व अधिकार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांना भेटणार आहेत. अकॅडमिक व अॅडमिनिस्ट्रेटिव्ह अधिकार आता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्याकडे गेल्याने कुलगुरू हे फक्त रबर स्टॅम्प राहतील. त्याचबरोबर सिनेट अध्यक्षपदसुद्धा मंत्र्यांकडे जाणार आहे.
हेही वाचा -No Election Assembly Speaker : अखेर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नाहीच