मुंबई- भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीच्या निर्गुंतवणुकीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्यासाठी केंद्रातल्या विरोधकांनी एकत्रित प्रयत्न करावे, अशी मागणी कामगार नेत्यांनी केली आहे.
विरोधकांनी एलआयसीचे खासगीकरण रोखावे, कामगार नेत्यांची मागणी
एलआयसीचे खासगीकरण रोखण्यासाठी विरोधकांनी 'डोन्ट सेल एलआयसी' ही मोहीम राबवावी, अशी मागणी कामगार नेत्यांनी केली आहे.
एलआयसी
काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी 'डोन्ट सेल एलआयसी' ही मोहीम राबवावी, असे आवाहन कामगार नेते विश्वास उटगी यांनी केले आहे.