मुंबई- पावसाळीच्या अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विरोधकांनी सरकारविरोधात उघडलेली मोहीम मागे घेतली. तसेच कामकाजात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पायऱ्यांवरील घोषणा आणि आंदोलनाच्या बाबतीत विरोधक सताधाऱ्यांपुढे नरमले असल्याचे चित्र आहे.
पावसाळी अधिवेशन : विधीमंडळ अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विरोधक नरमले - पावसाळीच्या अधिवेशन
योगा दिन आणि तेलंगणातील सिंचन प्रकल्पाच्या निमित्ताने मुख्यमंत्री शहराबाहेर आहेत. त्यामुळे सभागृहाच्या कामकाजात शिथिलता होती.
विधानसभेमध्ये आज ११ वाजण्याच्याऐवजी विशेष बैठक घेऊन सकाळी १० वाजता विधानसभेचे कामकाज सुरू झाले. मात्र, गणसंख्या नसल्याने सुरुवातीलाच १० मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले होते. योगा दिन आणि तेलंगणातील सिंचन प्रकल्पाच्या निमित्ताने मुख्यमंत्री शहराबाहेर आहेत. त्यामुळे सभागृहाच्या कामकाजात शिथिलता होती.
पुढचे दोन दिवस विधीमंडळाचे कामकाज होणार नाही. त्यामुळे प्रश्नोत्तर, लक्षवेधी सुचना, दुष्काळा आणि विधेयके यावर चर्चा होऊन विधानसभेचे कामकाज दुपारपर्यंत आटोपण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या चौथ्या दिवसापर्यंत विरोधक चांगलेच आक्रमक होते. फडणवीस सरकारच्या विरोधात सभागृहाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करीत होते. मात्र, आज असे चित्र दिसले नाही.