महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Contract Police Bharti : मुंबई कंत्राटी पोलीस भरती प्रक्रियेवरून विरोधक आक्रमक - कंत्राटी पोलिसांची भरती

मुंबई पोलीस खात्यात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती केली जाणार असल्याचा गृह खात्याकडून निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयाला आता विरोध होताना दिसत आहे.

Mumbai News
पोलीस भरती प्रक्रियेवरून विरोधक आक्रमक

By

Published : Jul 25, 2023, 5:28 PM IST

Updated : Jul 25, 2023, 10:13 PM IST

मुंबई : पोलीस होणाऱ्यांसाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण येत्या काळामध्ये मुंबई पोलीस खात्यात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती केली जाणार असल्याचा, गृह खात्याकडून निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान पहिलेच राज्यात सरकारी कंत्राटी कर्मचारी भरती संदर्भात वाद सुरू असून, आता पोलीस दलातही कंत्राटी पोलीस भरती केली जाणार असल्यामुळे, विरोधकांकडून सरकारवर हल्ला चढवला आहे.




राज्य सरकार अग्नीवीरचा छोटा भाऊ करतोय का: मुंबई पोलीस दलातील कंत्राटी भरतीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला थेट सवाल केला आहे. मुंबई पोलिसात भरती करणार, ही प्रथा म्हणून चुकीची गोष्ट आहे. अशा प्रकारची भरती हे लोकांसाठी आणि पोलिसांसाठी घातक आहे. राज्य सरकार अग्निवीरचा छोटा भाऊ करत आहे का? अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे. आम्ही याचा निषेध करतो. तसेच कंत्राटदाराला सरकार मोठ करत आहे का? असा आरोप करत सरकारला रोहित पवार यांनी प्रश्न विचारून आपला संताप व्यक्त केला आहे.


सरकार सुद्धा कंत्राटी काय: महाराष्ट्रात अतिवृष्टी सुरू असून त्यात मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होत आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. अजून सर्व्हे सुरू झाला नाही. ED सरकार आल्यापासून फक्त घोषणांचा पाऊस पडत आहे. जनतेचा आता सरकारवर भरोसा राहिला नसल्याची प्रतिक्रिया, नाना पटोले यांनी दिली आहे. मुंबई कंत्राटी पोलीस भरतीवरून त्यांनी सरकारचा समाचार घेतला. पोलीस भरतीसुद्धा कंत्राटी पद्धतीने होणार आहे. आता हे सरकारसुद्धा कंत्राटी आहे का? अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.



अशी भरती करणे अयोग्य: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलीस कंत्राटी भरतीवरून गृहविभाग विभागाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. माझ्या कानावर आले की, पोलीस खात ही मोठी यंत्रणा आहे. त्यामुळे पोलीस खात्यातील वेगवेगळ्या विभागात गोपनीयता खूप महत्त्वाचा विषय असतो. सध्या तरी नक्की माहिती नाही पण, अशा पद्धतीने जर कंत्राटी भरती होणार असेल तर ते योग्य नाही असे मत अनिल देशमुख यांनी व्यक्त केले आहे. आमच्या सरकारच्या काळात मी शक्ती कायदा आणला होता. त्याचे प्रारूप हे विधानसभा आणि विधानपरिषदेत मंजूर करून केंद्रात पाठवला होता. मात्र अजूनही त्याला केंद्राने सरकारने मंजुरी दिलेली नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. केंद्रसरकारने मंजूरी दिली तर लवकरात लवकर आरोपीवर कठोर कारवाई करता येऊ शकते. त्यात एक प्रावधान होते की, चौकशीमध्ये दोषी आढला तर फाशीची शिक्षा देण्याचे प्रयोजन होते.



तर वाटोळ झाले महाराष्ट्राचे: पोलीस भरती जर कंत्राटी पद्धतीने होत असेल तर वाटोळ झाले महाराष्ट्राचे काय बोलणार, अशी हात जोडत प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. तर पोलीस प्रशासनाकडे महत्त्वाची खाती असतात. कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती केली तर काय होईल असा उपरोधित सवाल, उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी उपस्थित केला आहे.



आमचे गृहमंत्री वसुलीबाज नाहीत: मुंबई पोलीस दलात कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती होणार असल्याच्या प्रश्नाला भाजपचे आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सगळ्या वस्तुस्थितीचा विचार करूनच निर्णय घेतील. आमचे गृहमंत्री वसुलीबाज गृहमंत्री नसल्याचा टोला महाविकास आघाडीला त्यांनी लगावला आहे.



हेही वाचा -

  1. Mumbai Police Threat Call : मुंबई पोलिसांना वारंवार धमकीचे फोन; हॉक्स कॉलिंगची काय आहे गडबड?
  2. NCP Protest Against Manipur Violence: मणिपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध; राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाकडून आज मौनव्रत आंदोलन
  3. Devendra Fadnavis on Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितले...
Last Updated : Jul 25, 2023, 10:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details