मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातत्याने घसरणाऱ्या शेअर बाजारात आज गुंतवणूकदारांना दिलासादायक चित्र दिसले. बाजार खुला होताच मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने ५०० अंशांची उसळी घेतली. तर राष्ट्रीय बाजाराच्या निर्देशांकामध्येही २४८ अंशांची वाढ झाली.
निर्देशांकामध्ये मोठी वाढ झाल्याने सेन्सेक्स २९,३१६.८० अंशांवर तर निफ्टी ८,५२९.३५ अंशांवर जाऊन पोहोचले. रिलायन्स समूह, इन्फोसिस, एचडीएफसीचे दोन्ही शेअर्स चढे राहिल्याने बाजारात तेजीचे चित्र दिसून आले.
टाटा स्टील, एचडीएफसी, ॲक्सिस बँक, एम अँड एम, रिलायन्स समूह, ओएनजीसी, आयटीसी, एचसीएल टेक आणि टायटन यांचे शेअर तीन टक्क्यांनी वधारले. तर दुसऱ्या बाजूला इंडुसइंड बँक, बजाज फायनान्स, बजाज ऑटो आणि मारुती यांचे शेअर घसरले.