मुंबई -युपीएचे (संयुक्त पुरोगामी आघाडी ) अध्यक्षपद शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्याकडे देण्यात यावे, असा प्रस्ताव राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ( NCP Youth Wing Meeting Mumbai ) राष्ट्रीय कार्यकारिणी पास करण्यात आला आहे. काल दिल्लीत झालेल्या या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक कार्यकारणीकडून हा प्रस्ताव पास झाला. मात्र, या प्रस्तावानंतर, देशाचे सक्षम नेतृत्व सोनिया गांधीच ( Sonia Gandhi ) याच करू शकतील, असे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. विरोधी पक्षांमध्ये विरोधाभास धोकादायक आहे. गेल्या पंधरा वर्षापासून युपीएचे अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी सक्षमपणे काम पाहत आहेत. केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात विरोधकांना एकत्र आणण्याचे काम सोनिया गांधी यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या प्रस्तावाचा आपण सन्मान करत असलो. तरी, नेतृत्व करण्यास सोनिया गांधी सक्षम असल्याचं अतुल लोंढे ( Congress Leader Atul Londhe ) यांनी काँग्रेसकडून स्पष्ट केले.
Congress on UPA President : देशाचं प्रतिनिधीत्त्व सोनिया गांधीच करू शकतात, राष्ट्रवादीच्या प्रस्तावाला काँग्रेसचे उत्तर - युपीए नेतृत्त्वासाठी सोनिया गांधी सक्षम
युपीएचे (संयुक्त पुरोगामी आघाडी ) अध्यक्षपद शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्याकडे देण्यात यावे, असा प्रस्ताव राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ( NCP Youth Wing Meeting Mumbai ) राष्ट्रीय कार्यकारिणी पास करण्यात आला आहे. काल दिल्लीत झालेल्या या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक कार्यकारणीकडून हा प्रस्ताव पास झाला.
हेही वाचा -नाणारमध्ये प्रकल्प होणार नाही, दुसरे ठिकाण घेताना स्थानिकांना विश्वासात घेऊ - मंत्री आदित्य ठाकरे
शरद पवारांना यूपीएचे अध्यक्ष करा, राष्ट्रवादीचा प्रस्ताव -2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी सत्तेत असलेल्या मोदी सरकारच्या विरोधात सक्षम पर्याय उभारायला हवा. हा पर्याय काँग्रेस उभा करू शकणार नाही. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी युपीएचे अध्यक्ष शरद पवार यांना करण्यात यावे, असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसच्या काल झालेल्या युवक कार्यकारणी संमत करण्यात आला आहे. त्यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही केंद्रीय तपास यंत्रणेच्या विरोधात सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. याबाबत लवकरच दिल्लीमध्ये बैठक घेतली जाणार आहे. यासाठी ममता बॅनर्जी यांनी शरद पवार यांनादेखील बैठकीत बाबतचे पत्र पाठवले आहे. त्यामुळे या बैठकीच्या माध्यमातूनही विरोधकांची मोट बांधण्याचे काम सुरू झाले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आता केली जात आहे.