महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत केवळ 30 टक्केच हॉटेल सुरू; हॉटेल मालकांचा नाराजीचा सूर - मुंबई हॉटेल व्यवसाय सुरू न्यूज

सरकारने दिलेल्या नियमांनुसार लॉज, गेस्ट हाऊस बुधवारपासून (8 जुलै) सुरू करण्यात आले आहेत. मात्र, सरकारच्या या निर्णयाचा लाभ केवळ पंचतारांकित हॉटेलांना होऊ शकतो. कमी खोल्यांचे हॉटेल आणि लॉजला या नियमावलीत व्यवसाय सुरू करणे जिकिरीचे होणार असल्याची प्रतिक्रिया हॉटेल चालकांमधून येत आहे.

Hotel
हॉटेल

By

Published : Jul 8, 2020, 7:01 PM IST

मुंबई -राज्य सरकारने काही अटींवर हॉटेल सुरू करण्याला परवानगी दिली आहे. असे असले तरीही मुंबई शहरात केवळ 30 टक्केच हॉटेल सुरू असल्याचे निदर्शनाला आले आहे. सरकारने आखून दिलेल्या नियमावलीवर काही हॉटेल मालकांनी नाराजीही व्यक्त केली आहे. शहरात काही ठिकाणी छोटी हॉटेल्स सुरू झाली असली तरी मोठे रेस्टॉरंट्स अजूनही सुरू झाले नसल्याची माहिती आहार संघटनेचे पदाधिकारी शिवानंद शेट्टी यांनी दिली.

हॉटेल्सचे निर्जंतुकीकरण आणि कामगार कमतरतेमुळे हॉटेल्समध्ये आलेल्या ग्राहकांना हॉटेलमध्ये बसण्याची परवानगी न देता, पदार्थ पार्सल देत आहेत. मुंबई शहरात 10 हजार 500 छोटी हॉटेल्स आहेत. त्यातील केवळ 30 टक्के हॉटेल सुरू झाले असल्याची माहिती हॉटेल्स असोसिएशनचे अध्यक्ष गुरुबीर सिंग यांनी दिली.

सरकारने दिलेल्या नियमांनुसार लॉज, गेस्ट हाऊस आजपासून (8 जुलै) सुरू करण्यात आले आहेत. मात्र, सरकारच्या या निर्णयाचा लाभ केवळ पंचतारांकित हॉटेलांना होऊ शकतो. कमी खोल्यांचे हॉटेल आणि लॉजला या नियमावलीत व्यवसाय सुरू करणे जिकिरीचे होणार असल्याची प्रतिक्रिया महेश राठोड या लॉज मालकाने दिली.

कामगारांच्या कमतरतेमुळे शहरातील काही हॉटेल अद्याप सुरू करण्यात आलेले नाहीत. त्यात सरकारने हॉटेल क्षमतेच्या केवळ 33 टक्के हॉटेल सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे हॉटेलचे भाडे ,कामगारांच्या पगार, कर ,हप्ते देणे छोट्या हॉटेल्सधारकांना परवडण्यासारखे नाही. मात्र, तरीही ग्राहकांच्या सोयीसाठी आणि हॉटेलचे भाडे देण्यासाठी आजपासून हॉटेल सुरू केले आहे, असे परळच्या अदिती व्हेज रेस्टॉरंटचे मालक हितेश यांनी सांगितले.

अनेक व्यावसायिक हॉटेल भाड्याने घेऊन चालवतात. मागील साडे तीन ते चार महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने हा व्यवसाय पूर्ण बंद होता. त्यामुळे हॉटेल कामगार आणि व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली. ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी हॉटेल असोसिएशनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी वेळोवेळी पत्र व्यवहार केला. त्यानंतर आता परवानगी देण्यात आली आहे. परंतु यामध्ये छोट्या व्यवसायिकांचा विचार केला नसल्याचे दिसत आहे. जे नियम देत हॉटेल, रेस्टॉरंट आणि लॉज सुरू करण्यात आले. त्याचा मोठ्या हॉटेल्सना फायदा होणार आहे. कारण त्यांनी ग्राहकांची मेंबरशीप अगोदरच घेतलेली आहे. तसेच सरकारने नागरिकांना क्वारंटाईन करण्याचे देखील त्यांना पैसे दिलेले आहेत. त्यामुळे त्यांचे काही नुकसान नाही. मात्र, 33 टक्क्यांच्या नियमानुसार छोटे हॉटेल व्यवसाय सुरू करणे काहींना अशक्य आहे. नाईलाजास्तव काही हॉटेल चालकांनी व्यवसाय सुरू केला आहे. सर्व हॉटेल्स 100 टक्के सुरू करण्याची शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी कोकण स्वाद हॉटेलचे मालक धनंजय केणी यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details