महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Online Money Fraud : फिल्म कलाकार धर्मेश व्यास यांची 1 लाख रुपयाची ऑनलाईन फसवणूक - फिल्म कलाकार धर्मेश व्यास

पासपोर्ट डिस्पॅच (passport dispatch) करण्याच्या नावाखाली फिल्म कलाकार धर्मेश व्यास (actor Dharmesh Vyas) यांची 1 लाख रुपयाची ऑनलाईन फसवणूक (Online money fraud)फसवणूक झाल्याचे समजते. 09/12/22 रोजी सायंकाळी 17.15 वाजता त्यांच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यातून एकूण 99,999/- रु. वजा झाल्याचा मेसेज प्राप्त झाला. तेव्हा त्यांनी तात्काळ त्यांच्या बँकेची संपर्क करून त्यांच्या खात्यातून रक्कम वजा झाल्याचे सांगितले.

Online Money Fraud
ऑनलाईन फसवणूक

By

Published : Dec 13, 2022, 5:18 PM IST

मुंबई :फिल्म कलाकार धर्मेश व्यास (actor Dharmesh Vyas) यांची 1 लाख रुपयाची ऑनलाईन फसवणूक (Online money fraud) झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. पासपोर्ट डिस्पॅच (passport dispatch) करण्याच्या नावाखाली ही फसवणूक झाल्याचे समजते. (Latest news from Mumbai) मात्र धर्मेश यांनी वेळेत तक्रार केल्याने गोल्डनअवरमध्ये फसवणूक झालेले सर्व पैसे परत मिळवून देण्यास ओशिवरा पोलिसांच्या सायबर सेलला यश मिळाले आहे. (Mumbai Crime)

खात्यातून पैसे वजा: मिळालेल्या माहितीनुसार धर्मेश जय किशोर व्यास यांना त्यांच्या मोबाईलवर एक फोन कॉल आला होता. तुमचा पासपोर्ट आला आहे. मात्र डिस्पॅच करण्यासाठीचा कोड ब्लॉक करण्यात आला आहे. तो अनब्लॉक करण्यासाठी पाच रुपये पाठवावे लागतील, यानंतर तुमचा पासपोर्ट दोन तासात तुमच्या घरी पोहोचेल असे समोरील व्यक्तीने फोनवर सांगितले. मात्र धर्मेश व्यास हे चित्रपटाच्या चित्रीकरणांमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांनी समोरील व्यक्तीच्या नंबरवर पाच रुपये पाठवले. मात्र 09/12/22 रोजी सायंकाळी 17.15 वाजता त्यांच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यातून एकूण 99,999/- रु. वजा झाल्याचा मेसेज प्राप्त झाला. तेव्हा त्यांनी तात्काळ त्यांच्या बँकेची संपर्क करून त्यांच्या खात्यातून रक्कम वजा झाल्याचे सांगितले. तेव्हा बँकेने त्यांच्याबरोबर ऑनलाइन फ्रॉड झाल्याचे सांगितले. तेव्हा तक्रार यांना त्यांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

गुन्हा दाखल :तक्रारदार धर्मेश व्यास हे त्यांची ऑनलाइन फसवणूक केल्याबाबतची तक्रार घेऊन ते समक्ष पोलीस ठाण्यास आले असता तात्काळ दखल घेऊन ओशिवरा पोलीस ठाणे येथे कलम 419,420 भादविसह 66(क)(ड) माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

Refund साठी बँकेमार्फत प्रक्रिया :यानंतर ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनावडे, वपोनि सकुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे सायबर अधिकारी पोउनि दिगंबर कुरकुटे,अशोक कोंडे,विक्रम सरनोबत यांनी तात्काळ प्राप्त माहितीच्या आधारे व फिर्यादी यांच्या एचडीएफसी बँकेच्या मॅनेजर शी संपर्क साधून तक्रारदार यांची फसवणूक झालेली रक्कम ही IDFC Fast बँक खात्यात ट्रान्स्फर झाल्याने नोडल अधिकारी यांचेशी संपर्क करुन व ईमेलद्वारे पत्र व्यवहार करून तात्काळ फिर्यादी यांची फसवणूक झालेली सर्व रक्कम 99,999/-रु. freeze करण्यात यश प्राप्त झाले. रक्कम फिर्यादी यांना Refund करण्याची बँकेमार्फत प्रक्रिया सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details