मुंबई: शिवडी पोलीस ठाण्यात विरार पूर्व येथे राहणाऱ्या केतन किरण येदे, वय 39 वर्षे यांनी 26 जुलै 2022 ला ऑनलाइन पी.के वाईन्स शॉपच्या साईट वरती ऑनलाइन दारू खरेदीसाठी मोबाईवर संपर्क केला. आरोपी यांनी तक्रारदार केतन येदे यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या आयसीआयसीआय बँकचा क्रेडिट कार्ड मधून 2 लाख 39 हजार 723 रुपयांना गंडा घातला.
गुन्हा घडल्यानंतर मोबाईल केला बंद: याप्रकरणी शिवडी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 420 सह कलम 66 (क) (ड) आयटी ॲक्ट नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या मोबाईल क्रमांक हा गुन्हा घडल्यानंतर बंद आढळून येत होता. या मोबाईलच्या सीडीआर काढून माहिती घेतली. मोबाईलचा आयएमईआय प्राप्त करण्यात आला होता.
संबंधित मोबाईल क्रमांक प्राप्त: या गुन्हाचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक सचिन माने आणि त्यांच्या पथकाने 40 मोबाईल क्रमांकाचे सीडीआर व 30 आयएमईआय मध्ये वापरले जात असलेल्या क्रमांकाचे सीडीआरचे अवलोकन केले. काही गुन्ह्याशी संबंधित मोबाईल क्रमांक प्राप्त केले. तसेच बँक, पेटीएम, गुगल पे याची माहिती प्राप्त करण्यात आली. दाखल गुन्हातील आरोपी हे कुलियाना, मेवाड, डिग्गी, राजस्थान येथे असल्याचे निदर्शनास आले.
राजस्थान येथून घेतले ताब्यात: वरिष्ठांच्या परवानगीने या गुन्ह्याच्या तपास कामी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहलसिंग खुळे, पोलीस उपनिरीक्षक राहुल शिंदे, पोलीस हवालदार देशमुख, पोलीस शिपाई आठरे, जाधव, माळोदे हे या गुन्ह्याच्या तपास कामी कुलियाना, मेवाड, डिग्गी, राजस्थान येथे रवाना झाले होते. हा गुन्हा करत्यावेळेस वापरलेल्या मोबाईल संबंधित दुसऱ्या मोबाईल मध्ये वापरण्यात येत असलेल्या मोबाईल क्रमांकाचे सीडीआरच्या अवलोकन करून, संबंधित मोबाईलचे लोकेशन प्राप्त करून स्थानिक पोलिसांच्या मदतीने जहीर सत्तार यास केतवाडा डीग राजस्थान येथून ताब्यात घेण्यात आले.
आरोपीकडून 2 मोबाईल हस्तगत: या गुन्हातील दुसरा आरोपी याच्या मोबाईल क्रमांकचे सीडीआर प्राप्त करून त्याचे अवलोकन करून स्थानिक परिसरातील लोकांना विश्वासात घेऊन पोलीस पथकाने आपला पहिराव बदलून, आरोपी अब्दुल चुटमल याला कुलियाना डीग राजस्थान येथून पळून जात असताना शिताफीने ताब्यात घेतले. या आरोपिंकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला. त्यांचा गुन्हातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली. या आरोपीकडून 2 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. आरोपिंना ताब्यात घेण्यात आलेला परिसर हा खूप भयानक होता. त्या परिसरात पोलिसांवरती हल्ले झाले आहेत.
सापळा रचून घेतले ताब्यात: तसेच या गुन्हातील संबंधित इसमाचा मोबाईल क्रमांक प्राप्त केला. तसेच बँकमध्ये जाऊन महिती घेवून सागर सैनी यास मोबाईल लोकेशन नुसार अलवर येथून सापळा रचून ताब्यात घेण्यात आले आहे. या गुन्हात अब्दुल चुटमल खान या आरोपीला अटक करण्यात आली. मोहम्मद जहीर सत्तर खान आणि सागर भैरू लाल सैनि या दोन्ही व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून दोन विवो कंपनीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
हेही वाचा:Mumbai Gangsters दाऊद मोकाटच इंटरपोलमुळेच गुंड अबू सालेम संतोष शेट्टी आणि छोटा राजनला अटक