मुंबई- ऑनलाईन मैत्री करत मालाड येथे फसवणूक करणाऱ्या आरोपींना मालाड कुरार पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, जगजीतसिंग महेंद्रसिंग गरचा यांना फसवणूक झाल्याची पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तपासावरून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या टोळीला गजाआड केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हायफाय या मेसेंजर अॅपवर एक रोजमेरी किस्टन या महिलेने स्वतःला डॉक्टर असल्याचे सांगून मेसेजेसद्वारे जगजीतसिंग महेंद्रसिंग गरचा यांच्याशी ओळख केली. तसेच व्हॉट्सअपवर संभाषण चालू केले. त्यावेळी रोजमेरी किस्टन हिने मेल करून ती काम करत असलेल्या कंपनीमध्ये कॅन्सर आजारावर गुणकारी असे औषध तयार होत आहे. त्यासाठी 14 लाख 40 हजार रुपयाला ते औषध असल्याचे तिने सांगितले. त्यानुसार गरचा यांनी यावर विश्वास ठेवून एसजी इंटरप्रायजेस या बँक खात्यावर 14 लाख 40 हजार रुपये जमा केले. त्यानंतर सदर केमीकलबाबत विचारणा केली असता, तिच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. त्यावेळी फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
हेही वाचा -खूप पैसे आले म्हणजे अक्कल येत नाही, जितेंद्र आव्हाडांचा काकडेंना टोला