मुंबई - कोरोनाचा वाढता प्रादुर्भात लक्षात घेता राज्य शालेय शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे. त्याच पार्श्वभूमीर आता दूरदर्शनवर पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. यासाठी 'टीली-मिली' नावाची आनंददायी शिक्षण देण्याची मालिका ही सोमवार ते शनिवार या कालावधीत सुरू असणार आहे. याची सुरुवात 20 जुलैला झाली असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
मागील अनेक दिवसांपासून दूरदर्शनवर ऑनलाईन शिक्षणासाठी वेळ देण्याची मागणी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्याला वेळेत प्रतिसाद मिळाला नसल्याने शिक्षण मंत्र्यांनी जिओ वाहिनीच्या नऊ वाहिन्या आणि जिओ रेडिओसोबत करार करुन शैक्षणिक कार्यक्रम त्यावर सुरू केले होते. मात्र, नुकतेच त्यांना सह्याद्री वाहिनीवर शैक्षणिक कार्यक्रम दाखविण्याची परवानगी मिळाली. यानंतर 'टीली'मिली' कार्यक्रमाच्या माध्यमातून पहिली ते आठवीपर्यंच्या विद्यार्थ्यांकरिता शिक्षणाचे धडे दुरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर द्यायला सुरुवात झाली.