मुंबई:भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणावर शेती केली जात असते. राज्यातील शेती पिकांमध्ये कांदा, ऊस, कापूस सोयाबीन टोमॅटो द्राक्षे आणि अन्नधान्यांची देखील मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. गेल्या काही दिवसापासून टोमॅटोचा भाव वाढल्यामुळे सामान्यांच्या जेवणातून टोमॅटो काहीसा बाजूला सरला गेलाय. (Onion Seller Farmers In Trouble) (NAFED conditions for onion purchase) (40 percent duty on onion export) (NAFED onion procurement process) (farmers trouble due to NAFED terms) (Onion Seller About NAFED)
नाफेडकडून शेतकऱ्यांची चेष्टा:राज्यातील शेतकऱ्यांच्या कांदा पिकांवर 40 टक्के निर्यात शुल्क लावून कांद्याची दर पाडले जातात. त्यानंतर नाफेडच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करणार आहे. मात्र कांदा खरेदीसाठी नाफेडच्या 12 अटी म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा असल्याचे अजित नवले यांनी म्हटले. या 12 अटीतून पास झालेला कांदाच नाफेड खरेदी करणार आहे. यामुळे भीक नको पण कुत्रा आवर असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. चार महिने चाळीत साठवलेला कांदा ह्या 12 अटी-शर्ती पास करेल असा कांदा महाराष्ट्रात शोधूनही सापडणार नाही, अशी परिस्थिती सध्या राज्यात आहे. शेतकऱ्यांची क्रूर चेष्ठा सरकार करत असल्याचा आरोप नवले यांनी केला आहे.
कांदा विक्रीसाठी लागणारे कागदपत्रे:आधार कार्ड झेरॉक्स, 7/12 झेरॉक्स, शेतीत कांदा पिक लागलेले असले पाहिजे, बँक पासबुक झेरॉक्स, या सर्व झेरॉक्स कागदपत्रांवर स्वाक्षरी करून जमा करणे.