महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कांदा प्रश्नावर मोठी बातमी, केंद्र सरकार खरेदी करणार महाराष्ट्रातील सर्व कांदा - Onion Purchasing Issue

Onion Purchasing Issue: केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय (Onion Export Ban) घेतल्याने महाराष्ट्रातील हजारो कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशातच राज्य विधिमंडळाच्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी हा मुद्दा जोरात उचलून धरला. (Onion Producer Farmers) यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदा निर्यात बंदी उठवली गेली नाही तर, राज्यातील सर्व कांदा केंद्र सरकार खरेदी करणार, असं विधानपरिषदेमध्ये सांगितलं.

Onion Purchasing Issue
देवेंद्र फडणवीस

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 11, 2023, 6:53 PM IST

मुंबईOnion Purchasing Issue : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. यंदा राज्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झालेले असताना केंद्र सरकारचा हा निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी फार मोठा घातक ठरला आहे. केंद्र सरकारने यापूर्वी कांदा निर्यातीवर ४० टक्के टॅक्स बसवला. यानंतर आता कांदा निर्यातीवर १०० टक्के बंदी आणल्याने राज्यात याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. राज्य विधिमंडळाच्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आज दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षांनी या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कांदा निर्यात बंदी प्रश्नावर सरकारवर जोरदार हल्लाबोल करत, सरकार यातून काय मार्ग काढत आहे? असा खडा सवाल विचारला. (Central Govt Regarding Onion Purchase)

केंद्र सरकार त्यांचा भाव घोषित करेल :अंबादास दानवे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले आहे की, वास्तविक अवकाळी पाऊस व शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर दोन्ही सभागृहात चर्चा सुरू झालेली आहे. त्याला सविस्तर उत्तर चर्चेअंती देण्यात येईल. परंतु कांदा निर्यात बंदीच्या विषयावर मीसुद्धा केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली आहे. साधारणत: आपल्या देशामध्ये कांदा मोठ्या प्रमाणात असतो तेव्हा आपण निर्यातीची परवानगी देतो. परंतु आता देशामध्ये कांदा २५ ते ३० टक्के कमी आहे. त्यामुळे आपण निर्यातीची परवानगी दिली तर देशामध्ये मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण होईल. यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. तथापि आम्ही त्यांना विनंती केली की, कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये. आज जुना कांदा व्यापाऱ्यांकडे गेला आहे. शेतकऱ्यांकडे नवीन कांदा आहे. जोपर्यंत निर्यात बंदीबाबत निर्णय होत नाही. तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत जर शेतकरी अडचणीत असेल, कांदा खरेदी होत नसेल, लिलाव होणार नसतील तर सर्व कांदा केंद्र सरकार खरेदी करायला तयार आहे. लवकरच केंद्र सरकार याबाबत त्यांचा भाव घोषित करेल. तरी आम्ही त्यांना विनंती केली आहे. कांदा खरेदीबाबत आमचे कृषीमंत्री, पणन मंत्री केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना पुन्हा भेटणार आहे. यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न चालू आहे, असे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा:

  1. मध्य प्रदेशात भाजपाचा दे धक्का! शिवराज सिंह चौहान यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवलं, वाचा नवीन मुख्यमंत्री कोण
  2. कलम ३७०; न्यायालयाच्या निकालाचे स्वागत, पण काश्मिरी पंडितांच्या सुक्षेची हमी गरजेची, पाकव्याप्त काश्मीरही परत आणा - उद्धव ठाकरे
  3. "हिंमत असेल तर अजित पवारांना मुख्यमंत्री करा, ठाकरे गटाकडून मी ठराव मांडतो", भास्कर जाधवांचं सभागृहात आव्हान

ABOUT THE AUTHOR

...view details