महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Onion Price Increased : ऐन दिवाळीत कांद्यानं आणलं ग्राहकांच्या डोळ्यात पाणी; हॉटेलमधूनही कांदा गायब - गृहिणींचे बजेट कोलमडले

Onion Prices Increased : दिवाळीचा (Diwali 2023) सण तोंडावर आला तरी भाज्यांचे दर मात्र जैसेथेच आहेत. कांदा व टोमॅटोच्या दराने पन्नाशी ओलांडली आहे. बहुतांश भाज्यांचे दर २० ते ३० रुपये किलोमागे वधारले आहेत. यामुळे गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडत असल्याचे दिसून येत आहे.

Onion News
कांद्याचे भाव

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 6, 2023, 10:02 PM IST

माहिती देताना गृहिणी संतोषी जाधव

मुंबई Onion Prices Increased : ऐन दिवाळीच्या (Diwali 2023) तोंडावर व सणासुदीला डाळी, कडधान्य व साखरेचे भाव कडाडले असताना. आता रोजच्या जेवणातील कांद्याने देखील डोळ्यात पाणी आणलं आहे. जो कांदा एक आठवड्यापूर्वी २० ते २५ रुपये किलो भावानं मिळत होता. तोच कांदा आता ७० ते ८० रुपये किलोने विकला जात आहे. त्यामुळं दिवाळीच्या तोंडावर याआधीच डाळी, कडधान्य व साखर, गॅस आदींच्या किंमती वाढल्या आहेत, त्यानंतर आता कांद्याचे भाव भडकल्यामुळं 'सांगा कसं जगायचं...? जगायचं की, मरायचं' असा संतप्त सवाल गृहिणींनी उपस्थित केलाय.

घरातून, हॉटेलमधून कांदा गायब : कांदा हा रोजच्या जेवणात लागतोच. कांद्याशिवाय जेवणाला चव नाही. कांद्याशिवाय जेवणात फोडणी कशी द्यायची? कांदा हा जेवणातील अविभाज्य घटक आहे. परंतु, मागील आठवड्यापासून कांद्याने शंभरी गाठली आहे. त्यामुळं आम्ही घरी कांदाच आणायचं बंद केलाय. तसेच घरात जेवणात देखील कांदा वापरत नसल्याचं संतोषी जाधव या गृहिणीनं सांगितलं. तर दुसरीकडं कांद्याचे भाव कडाडल्यामुळं हॉटेलमध्ये देखील जेवणात किंवा मिसळसोबत मिळणारा कांदा आता गायब झालाय.

भाव कमी होण्याची शक्यता :दुसरीकडे दिवाळी अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली आहे. त्यातच अनेक जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले असताना, आता कांद्याचे भाव देखील वाढल्यामुळं प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे. परंतु, आगामी काळात कांद्याची आवक वाढेल आणि जो सध्या कांदा ७० ते ८० रुपयांना मिळतोय, तो कांदा २० रुपयांनी स्वस्त होईल, असा अंदाज मुंबई बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. पण एक मात्र नक्की, सणासुदीच्या काळात घरगुती वस्तूंच्या वाढलेल्या किंमती यामुळं गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

कांद्याने गाठली शंभरी : मागील आठवड्यापासून कांद्याने शंभरी गाठली आहे. त्यामुळं आम्ही घरी कांदाच आणायचे बंद केलं आहे. तसेच घरात जेवणात देखील कांदा वापरत नसल्याचं संतोषी जाधव या गृहिणीनं सांगितलं. तर दुसरीकडं कांद्याचे भाव कडाडल्यामुळं हॉटेलमध्ये देखील कांदा देणं बंद केलं आहे.

हेही वाचा -

  1. Onion Price: बळीराजा पुन्हा संकटात; कांदा निर्यात शुल्क रद्द, मात्र निर्यात मूल्यात वाढ...
  2. Onion Export News: कांदे दरवाढ रोखण्याकरिता केंद्राचा महत्त्वाचा निर्णय, निर्यातीवर प्रति टन 800 डॉलर निर्यातशुल्क लागू
  3. Onion Rate in Nashik : सणासुदीत कांदा उत्पादकांना येणार सुगीचे दिवस, कांद्याचे दर वाढू शकण्याची 'ही' आहेत कारणे

ABOUT THE AUTHOR

...view details