महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माहुल प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला वर्ष पूर्ण; मृतांना वाहिली श्रद्धांजली - uday samant mhada president

मुंबईमधील तानसा पाईपलाईन लगतच्या प्रकल्पग्रस्तांचे चेंबूर माहुल येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. चेंबूरमध्ये अनेक रिफायनरी प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमधून वातावरणात सोडण्यात येणाऱ्या गॅसमुळे प्रदूषणाचे प्रमाण जास्त आहे. यामुळे याठिकाणी राहणाऱ्यांना श्वसनाचे आणि त्वचेचे आजार होत आहेत. त्यात वर्षभरात १५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

माहुल प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला वर्ष पूर्ण; मृतांना वाहिली श्रद्धांजली

By

Published : Oct 29, 2019, 11:42 AM IST

मुंबई - माहुलमध्ये प्रदूषण असल्याने येथील प्रकल्पग्रस्तांचे माहुलबाहेर पुनर्वसन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. याची अंमलबजावणी राज्य सरकार आणि महापालिकेकडून केली जात नसल्याने प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला सोमवारी एक वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर माहुलमध्ये पुनर्वसन झाल्यानंतर मृत पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

माहुल प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला वर्ष पूर्ण; मृतांना वाहिली श्रद्धांजली

हेही वाचा -घाटकोपरमध्ये विद्यार्थ्यांकडून प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी

मुंबईमधील तानसा पाईपलाईन लगतच्या प्रक्लपग्रस्तांचे चेंबूर माहुल येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. चेंबूरमध्ये अनेक रिफायनरी प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमधून वातावरणात सोडण्यात येणाऱ्या गॅसमुळे प्रदूषणाचे प्रमाण जास्त आहे. यामुळे याठिकाणी राहणाऱ्यांना श्वसनाचे आणि त्वचेचे आजार होत आहेत. त्यात वर्षभरात १५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. प्रदूषणाच्या विरोधात माहुल प्रकल्पग्रस्त उच्च न्यायालयात गेले. त्यावेळी केंद्रीय हरित लवादाने माहुलमध्ये प्रमाणापेक्षा प्रदूषण असल्याचा दिलेला अहवाल ग्राह्य धरत माहुलमधील प्रकल्पग्रस्तांचे प्रदूषण नसलेल्या इतर ठिकाणी पुनर्वसन करण्याचे आदेश न्यायालयाने दिला.

हेही वाचा -जागतिक धम्म परिषदेसाठी बौद्ध धर्मगुरू दलाई लामा औरंगाबादेत

या आदेशाची अंमलबजावणी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून केली जात नसल्याने ज्या तानसा पाईपलाईनवरील झोपड्या तोडल्या, त्या जागी आंदोलन सुरू केले आहे. जेलभरो, रॅली काढण्यात आली, काळी दिवाळी साजरी करून आंदोलन करण्यात आले. तसेच प्रकल्पग्रस्तांनी माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या घराबाहेर निदर्शने करत आझाद मैदानावरही देखील आंदोलन केले. या आंदोलनाची दखल शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी घेतली. त्यानुसार म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी ३०० घरे देण्याचे आश्वासन दिले. मात्र, माहुलवासीयांना अद्याप ही घरे मिळालेली नाहीत. उच्च न्यायालयाने आदेश देऊनही त्या आदेशाची अंमलबजावणी केली जात नसल्याने माहुल प्रकल्पग्रस्तांचे प्रदूषण नसलेल्या ठिकाणी पुनर्वसन झालेले नाही.

माहुलमध्ये पुनर्वसन झाल्यापासून श्वसनाच्या आजाराने १५० हून अधिक प्रकल्पग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत असून या निमित्ताने मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच प्रदूषण नसलेल्या ठिकाणी घरे दिली जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निश्चय करण्यात आला.

टिसच्या गुहावटी, नागालँडमधील विद्यार्थ्यांचा पाठिंबा -

टाटा इन्स्टिट्यूट (टिस)च्या गुहावटी आणि नागालँड शाखेमधील विद्यार्थी गेले महिनाभर मुंबईत आहेत. या कालावधीत मुंबई आणि माहुलला या विद्यार्थ्यांनी अनेकवेळा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांना प्रमाणाच्या बाहेर प्रदूषण असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी माहुल प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. न्यायालयाने आदेश देऊनही सरकार प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन इतर ठिकाणी करत नसल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सरकारने या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन त्वरित प्रदूषण नसलेल्या ठिकाणी करावे, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details