मुंबई - विक्रोळी पश्चिम सिद्धिविनायक सोसायटीमधील लिफ्टमध्ये ( One died in an elevator in Siddhivinayak Society ) एक युवक अडकला होता. या युवकाला मुंबई अग्निशमन दलाने त्या युवकाला बाहेर काढून राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले असता त्याचा मृत्यू ( One dies after being stuck in an elevator ) झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
विक्रोळीत लिफ्टमध्ये अडकून एकाचा मृत्यू - One person died after getting stuck in an elevator
विक्रोळीतील पश्चिम सिद्धिविनायक सोसायटीत लिफ्टमध्ये ( One died in an elevator in Siddhivinayak Society ) अडकून एकाचा मृत्यू ( One died in an elevator in Siddhivinayak Society ) झाल्याची घटना घडली आहे. सिद्धिविनायक सोसायटीत लिफ्टमध्ये एकुण चार जण अडकले होते. चारपैकी तीन जण लिफ्टमधून स्वत:ची सुटक करत बाहेर आहे.
काचेच्या लिफ्टमध्ये ४ जण अडकले - मिळालेल्या माहितीनुसार, विक्रोळी रेल्वे स्टेशनजवळ सिद्धिविनायक सोसायटी आहे. तळ अधिक २४ माजली असलेल्या या इमारतीच्या काचेच्या लिफ्टमध्ये चार जण अडकले असल्याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. ४ पैकी ३ जण स्वतःच लिफ्टच्या बाहेर आले. आत अडकलेल्या एकाला बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाने बचाव उपकरणे, क्रेन, रेस्क्यू व्हॅन आदींच्या साहाय्याने एकाला बाहेर काढले.
एकाचा मृत्यू -अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत लिफ्टमध्ये अडकलेल्या एकाला बाहेर काढून राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. राजावाडी रुग्णालयात तपासणी केली असता त्या युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. शिवम जैस्वाल (२० वर्षे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.