मुंबई -अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वाहतुकीची व्यवस्था पाहणाऱ्या बेस्ट बसच्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली. तर आणखी एका कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही अशी माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
बेस्टच्या आणखी एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण; एकाचा अहवाल प्रतीक्षेत - गोरेगाव आगार
काही दिवसांपूर्वी बेस्ट उपक्रमाच्या वडाळा आगारामध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आता गोरेगाव आगारातील एका कर्मचाऱ्याने त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे स्वत: बेस्ट व्यवस्थापनाला कळवले आहे.
काही दिवसांपूर्वी बेस्ट उपक्रमाच्या वडाळा आगारामध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आता गोरेगाव आगारातील एका कर्मचाऱ्याने त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे स्वत: बेस्ट व्यवस्थापनाला कळवले आहे. मात्र, अद्याप या कर्मचाऱ्याने कोणताही रिपोर्ट सादर केलेला नाही. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे बेस्ट प्रशासनाने सांगितले.
तसेच बेस्टच्या आणखी एका कर्मचाऱ्याचे नातेवाईक कोरोना पॉझिटिव्ह आहेत. या कर्मचाऱ्याला त्याच्या इतर नातेवाईकांसोबत घरापासून दुसरीकडे क्वारंटाईन करण्यात आले आहे. या कर्मचाऱयाची चाचणी केली असून अहवाल मिळालेला नाही.