मुंबई - मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मात्र, आज एक दिलासादायक घटना घडली आहे. एका महिन्याच्या तान्हुल्याने कोरोनावर मात केली आहे. सर्व डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवत आज सायन रुग्णालयातून या चिमुकल्याला डिस्चार्ज दिला आहे.
दिलासादायक, मुंबईत एक महिन्याच्या तान्हुल्याची कोरोनावर मात - मुंबई कोरोनाबाधितांचा मृत्यू
मुंबईत कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. मुंबई महापालिका हद्दीमध्ये आतापर्यंत ३२ हजार ९७४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर १०६५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाला हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याच्या टीकाही विरोधक करत आहेत.
मुंबईत कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. मुंबई महापालिका हद्दीमध्ये आतापर्यंत ३२ हजार ९७४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर १०६५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाला हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याच्या टीकाही विरोधक करत आहेत. तसेच काही रुग्णालयातील वाईट स्थितीचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वी सायन रुग्णालयातील ढासळलेल्या कारभाराचे बरेच व्हिडिओ समोर आले होते. त्यामुळे मुंबईविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, आज एका महिन्याच्या चिमुकल्याने कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे या नकारात्मक वातावरणात काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.