मुंबई -घाटकोपर मानखुर्द लिंकरोडवरील देवनार कब्रस्थान जवळ एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. मृताचा चेहरा ओळखता येवू नये यासाठी चेहऱ्यावर दगड घालून चेहरा विद्रूप करण्यात आला आहे.
घाटकोपर मानखुर्द लिंक रोड परिसरात तरुणाची निर्घृण हत्या - killed
मृताचा चेहरा ओळखता येवू नये यासाठी चेहऱ्यावर दगड घालून चेहरा विद्रूप करण्यात आला आहे. मृताचे नाव बाबू चिरा भाई असे आहे.
![घाटकोपर मानखुर्द लिंक रोड परिसरात तरुणाची निर्घृण हत्या](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3177993-thumbnail-3x2-murder.jpg)
घाटकोपर मानखुर्द लिंक रोड परिसरात तरुणाची निर्घृण हत्या
या घटनेची माहिती एका महिलेने सुलभ शौचालय येथील कर्मचाऱ्याला दिली. कर्मचाऱ्याने ही बाब देवनार पोलीस ठाण्यात कळवली. मृताची ओळख पटली असून त्याचे नाव बाबू चिरा भाई (वय २७) असे आहे.