मुंबई - मुंबईत आज (बुधवारी) कोरोनाचे 1 हजार 132 नवे रुग्ण आढळून आले असून 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील कोरोना ग्रस्तांचा आकडा 1 लाख 26 हजार 371 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 6 हजार 940 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 923 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 1 लाख 70 वर गेला आहे.सध्या मुंबईत 19 हजार 064 सक्रिय रुग्ण आहेत. तर, मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर 79 टक्क्यांवर पोहचला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 86 दिवसांवर पोहचला आहे.
मुंबईत एक लाख रुग्णांची कोरोनावर मात; 1 हजार 132 नवे रुग्ण, 50 मृत्यू
मुंबईत आज (बुधवारी) कोरोनाचे 1 हजार 132 नवे रुग्ण आढळून आले असून 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील कोरोना ग्रस्तांचा आकडा 1 लाख 26 हजार 371 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 6 हजार 940 वर पोहचला आहे.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे मुंबईत आज 50 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी 39 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 30 पुरुष तर 26 महिला रुग्ण आहेत. मुंबईतून आज 923 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 1 लाख 70 वर पोहचला आहे. मुंबईत कोरोनाचे 1 लाख 26 हजार 371 रुग्ण असून 1 लाख 70 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 6 हजार 940 रुग्णांचा मृत्यू झाल्याने सध्या 19 हजार 064 सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 79 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 86 दिवस तर सरासरी दर 0.81 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 590 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 5 हजार 515 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 6 लाख 22 हजार 963 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.