नवी मुंबई : रबाळे एमआयडीसी परिसरातील नवरात्र उत्सवात अंगविक्षेप करत नाचणाऱ्या तरुणाने गरबा खेळू न दिल्याचा राग मनात ठेवून मज्जाव करणाऱ्या तिघांवर लोखंडी हातोड्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला (attack on three people who forbade playing garba)आहे.
या हल्ल्यात जखमी झालेल्या तिघांपैकी आकाश जयस्वाल या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू (One killed in a hammer attack) झाला. या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र पटवा, असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपी जितेंद्र हा अंगविक्षेप करत नाचत होता.
प्रतिक्रिया देताना डीसीपी विवेक पानसरे मनात राग ठेवून हल्ला -रबाळे एमआयडीसी परिसरात नवरात्र उत्सवात अंगविक्षेप करत नाचू दिले नाही. हा राग मनात ठेवून आरोपीने मनात राग ठेवून मध्यरात्री मंडपात झोपलेल्या तिघांवर आपल्याला गरबा का खेळू दिला नाही, याचा जाब विचारत लोखंडी हातोड्याने जबर हल्ला केला.
दुर्गादेवी समोर असा नाच न करण्याचे सांगितल्यानंतरही न ऐकल्याने त्याला मंडपातून बाहेर काढण्यात आले होते. याचाच राग मनात धरून आरोपीने मध्यरात्री मंडपात झोपलेल्या तिघांवर आपल्याला गरबा का खेळू दिला नाही याचा, जाब विचारत लोखंडी हातोड्याने जबर हल्ला (Hammer Attack in Navi Mumbai) केला.