मुंबई- मुंबई विमानतळावर एनसीबीने कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान पन्नास लाखांहून अधिक किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी काही परदेशी महिलांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे सोनं महिलांनी आपल्या शरीरात लपवून आणलं होती.
परदेशी महिलांच्या शरीरातून काढलं एक किलो सोनं; मुंबई विमानतळावरील प्रकार - NCB
मुंबई विमानतळावर एनसीबीने कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान पन्नास लाखांहून अधिक किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी काही परदेशी महिलांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे सोनं महिलांनी आपल्या शरीरात लपवून आणलं होती.
एनसीबीला सूत्रांकडून माहिती मिळाली होती की, काही महिला अमली पदार्थ तस्करीच्या उद्देशानं मुंबई विमानतळावर केनियामधून येत आहेत. या महिला विमानतळावर पोहोचल्या तेव्हा एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना हेरलं. ज्यावेळी यांना स्कॅन करण्यात आलं त्यावेळी त्यांच्या शरीरामध्ये एक वस्तू दिसून आली. सुरुवातीला अधिकाऱ्यांना वाटलं की हे अमली पदार्थ आहेत. वैद्यकीय तपासणीनंतर आणि शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या शरिरातील वस्तू बाहेर काढली तेव्हा ती सोनं आहे असं दिसून आले. महत्त्वाचं म्हणजे तीन महिलांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या शरीरातून एक किलो सोनं काढण्यात आलं आहे. सोन्याची किंमत 50 लाखांपेक्षा जास्त असल्याची माहिती आहे.