महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Chhatrapati Shahu Maharaj : शंभर वर्षांपूर्वी शाहू महाराजांनी दलितांकडे घेतला होता चहा; वाचा संपूर्ण कहाणी - Shahu Maharaj of Kolhapur

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आज मुंबई दौऱ्यावर असताना एका दलित कार्यकर्त्याच्या घरी जेवण करणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. या राज्यात अस्पृश्यता निवारणाची चळवळ सुमारे 100 वर्षांपूर्वी कोल्हापूरचा छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केली. महाराष्ट्र आज जवळपास अस्पृश्यता मुक्त आहे. कशी सुरू झाली ही चळवळ जाणून घेऊया.

Shahu Maharaj
Shahu Maharaj

By

Published : May 17, 2023, 8:42 PM IST

मुंबई :कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज हे सर्वार्थाने लोककल्याणकारी राजे होते. छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरातील जनतेसाठी शिक्षणाची दारे खुले केली. सर्व धर्मीयांसाठी वस्तीग्रह निर्माण करून त्यांनी सर्वांनी शिक्षण घ्यावे. यासाठी शिक्षणाचा सक्तीचा कायदा कोल्हापूर संस्थानात केला. छत्रपती शाहू महाराजांना समाजातील अस्पृश्यता अजिबात मान्य नव्हती. त्यांनी अस्पृश्यता निवारण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेऊन अनेक उपक्रम राबवले.

गंगाराम कांबळेला मारहाण :छत्रपती शाहू महाराजांच्या घोड्याच्या पागेत काम करणारा गंगाराम कांबळे हा मराठ्यांसाठी असलेल्या पाण्याच्या हौदावर पाणी घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी दलित समाजातील व्यक्तीने हौद बाटवला म्हणून मराठा समाजातील सवर्णांनी गंगाराम कांबळेला जबरदस्त मारहाण केली. शाहू महाराज त्यावेळी कोल्हापुरात नव्हते. कोल्हापुरात शाहू महाराज पुन्हा आल्यानंतर गंगाराम कांबळेने शाहू महाराजांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला.

महाराजांनी दिली मारेकऱ्यांना शिक्षा :छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळी मराठा समाजातील ज्या लोकांनी मारहाण केली होती. त्या लोकांना बोलावून स्वतः त्यांना चाबकाच्या फटक्यांनी झोडपून काढले. तसेच गंगारामच्या पाठीवर हात ठेवून त्याला सांगितले की, तू स्वतंत्र स्वतःचा व्यवसाय सुरू कर.

गंगाराम कांबळेचे सत्यशोधक हॉटेल :गंगाराम कांबळे यांनी छत्रपती शाहू महाराजांचा आदेश मानून कोल्हापूरच्या भाऊसिंगजी रोडवर स्वतःचे चहाचे हॉटेल काढले. ज्याला त्यांनी सत्यशोधक असे नाव दिले होते.

गंगारामच्या हॉटेलवर महाराजांनी घेतला चहा :समाजातील अस्पृश्यता दूर व्हावी आणि गंगाराम कांबळे सारख्या व्यक्तीचे हॉटेल चालावे यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी स्वतः 1919 मध्ये क्रांतिकारी विचार करत गंगारामच्या हातून चहा घेतला. तसेच केवळ स्वतः न घेता अन्य लोकांनाही तो घ्यायला लावला. इतकेच नाही तर, शाहू महाराजांनी स्वतःहून सोडा वॉटरचे मशीन घेऊन गंगाराम कांबळे यांना दिले. एकूणच महाराष्ट्रात अस्पृश्यता निवारणाची चळवळ शंभर वर्षांपूर्वी सुरू झाली. त्यामुळे महाराष्ट्रात आज भेदाभेद अभावानेच दिसते.


वाचा -

  1. Narendra Modi To Visit Japan : पंतप्रधान नरेंद्र मोदी शिखर परिषदेसाठी जपान, ऑस्ट्रेलियासह जाणार चार देशांच्या दौऱ्यावर
  2. Karnataka CM : दिल्लीत घडामोडींना वेग, सिद्धरामय्या-शिवकुमार खरगेंना भेटले
  3. PM Narendra Modi On Rozgar Mela : सरकारचे प्रत्येक धोरण रोजगार निर्मितीचे दार उघडणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

ABOUT THE AUTHOR

...view details