मुंबईFake Currency Case :मुंबईमध्ये डिसेंबर 2018 या काळात खंडणी विरोधी पथक पोलिसांना खबरी व्यक्तींकडून माहिती मिळाली की, काही व्यक्ती मुंबईत बनावट नोटा वितरित करीत आहेत. हे व्यक्ती पश्चिम बंगालमधील आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांनी याबाबत खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचला आणि मस्जिद बंदर मुंबई येथील पोलीस अंमलदारांनी याबाबत पूर्ण तयारी केली.
सापळा रचून आरोपींना अटक:पश्चिम बंगाल येथील एक इसम मस्जिद बंदर या ठिकाणी 18 डिसेंबर 2018 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास येणार असल्याची टीप पोलिसांना मिळाली. यावेळी पोलिसांनी सापळा रचून नाझीर हुसेन शेख आणि सिद्धेश्वर पंडित कबाडे उर्फ पाटील यांना पकडले. दरम्यान त्यांच्याकडून बनावट नोटा जप्त केल्या गेल्या. ही एकूण रक्कम 3 लाख 75 हजार रुपये इतकी होती. मुंबईतील मस्जिद बंदर येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी यासंदर्भात गुन्हेगारांची संपूर्ण तपासणी केली. त्यांच्याकडून बनावट नोटा जप्त केल्यानंतर त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे नोंदवले होते.
सरकारी वकिलाचा युक्तिवाद आला कामी:पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून जो मुद्देमाल जप्त केला त्यामध्ये 2000 हजारांच्या 178 नोटा आणि पाचशे रुपयांच्या 38 नोटा होत्या. याची एकूण रक्कम 3 लाख 75 हजार रुपये इतकी होती. सरकारी वकिलांनी आरोपींच्या गंभीर गुन्ह्याबाबत मुंबई सत्र न्यायालयांमध्ये बाजू मांडली की, भारतीय चलनी नोटांसारख्या दिसणाऱ्या बनावट नोटा यांच्याकडून 2018 या काळामध्ये जप्त केल्या गेल्या. उपलब्ध तथ्य पुराव्यांच्या आधारे त्यांना कडक तुरुंगवासाची शिक्षा झाली पाहिजे. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए सुब्रमण्यम यांनी आरोपी नाझीर हुसेन शेख यास दहा हजार रुपये दंड आणि दहा वर्षांचा तुरुंगवास तसेच आरोपी सिद्धेश्वर पंडित कवाडे उर्फ पाटील यास पाच हजार रुपये दंड आणि 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच दोघांनाही शिक्षा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली गेली. बनावट नोटांची अनेक प्रकरणे देशभरात उघडकीस येत आहेत. यावर आळा घालण्यासाठी पोलीस विभागाकडून ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
Fake Currency Case: बनावट नोटा प्रकरणी एकाला दहा तर दुसऱ्याला सात वर्षे तुरुंगवास; मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय - बनावट नोटा प्रकरण
Fake Currency Case: मुंबईमध्ये 3 लाख 75 हजारांच्या बनावट नोटा प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयामध्ये (Mumbai Sessions Court) महत्त्वाची सुनावणी पार पडली. त्यावेळेला मुंबई सत्र न्यायालयाने एका आरोपीला दहा वर्षांचा सश्रम कारावास तर दुसऱ्या आरोपीला सात वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. (Punishment in Fake Currency Case) 9 नोव्हेंबर रोजी सत्र न्यायालयाने या प्रकरणी अंतिम निकाल दिला. (Rigorous Imprisonment )
मुंबई सत्र न्यायालय
Published : Nov 9, 2023, 9:21 PM IST