महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तलवार परत मागितल्याच्या कारणावरून एका मित्राकडून दुसऱ्याचा खून - मुंबई लेटेस्ट न्यूज

तलवारीवरून दोन मित्रांमध्ये वाद झाला. त्यानंतर त्याच तलवारीने एकाने दुसऱ्यावर वार केले. यामध्ये एका मित्राचा मृत्यू झाला.

mumbai crime news  mumbai murder news  mumbai latest news  मुंबई लेटेस्ट न्यूज  मुंबई क्राईम न्यूज
तलवार परत मागितल्याच्या कारणावरून एका मित्राकडून दुसऱ्याचा खून

By

Published : Sep 4, 2020, 1:13 PM IST

मुंबई - मित्राच्या वाढदिवसाला दिलेली तलवार मित्राने परत केली नाही म्हणून झालेल्या वादात तलवार देणाऱ्या मित्राचाच खून केला. मुंबईतील अँटॉप हिल परिसरात ही घटना घडली. अँटॉप हिल परिसरात राहणाऱ्या नखील खान (19) या तरुणाने त्याच्याजवळील तलवार त्याचा मित्र साबीर शेख (19)या आरोपीला मित्राच्या वाढदिवसासाठी दिली होती. मात्र, मित्राचा वाढदिवस साजरा होऊन बरेच दिवस झाले तरी आरोपी साबीर शेख याने त्याच्याजवळील तलवार नखीलला दिली नव्हती.

गुरुवारी रात्री अँटॉप हिल परिसरात हे दोन्ही तरुण एकमेकांना भेटले असता नखील खान याने आरोपी साबीरला तलवार परत मागितली. तसेच तलवार द्यायची नसेल तर 3000 रुपये दे, असे बजावले. त्यावरून या दोघांमध्ये बाचाबाची झाली. आरोपी साबीर शेखने त्याच्या जवळील तलवारीने नखील खान याच्यावर हल्ला केला. यादरम्यान सोनू खान या तरुणाने दोघांना सोडवण्याचा प्रयत्न केला असता झालेल्या झटापटीत सोनू खान हा युवक सुद्धा जखमी झालेला आहे. या गोष्टीची माहिती अँटॉप हिल पोलीस ठाण्याला मिळताच केवळ तासाभरातच आरोपी साबीर शेख याला अटक करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details