मुंबई- साकिनाका येथील आनंद भुवन चाळीत गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच घरातील 6 जण जखमी झाले. जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी एका 15 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
साकिनाका येथील आनंद भुवन, जरीमरी, जगतापवाडी येथील एका चाळीत मंगळवारी (दि. 24 नोव्हेंबर) रात्री 9 वाजून 28 मिनिटांनी गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागली. या आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन घटनास्थळी दाखल झाले. 9 वाजून 53 मिनिटांनी अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवले. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू असतानाच या आगीत एकाच घरातील 6 जण भाजून जखमी झाले. या जखमींना पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी जखमींना तपासले असता रुग्णालयात आणण्यापूर्वीच अलमास या 15 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. योगीता यांनी दिल्याचे पालिकेच्या आप्तकालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
- जखमींची नावे
- अनिसा खान - 45 वर्षे महिला
- आस्मा - 60 वर्षे महिला
- रिहान - 8 वर्ष पुरुष
- सानिया - 14 वर्ष महिला
- शिफा - 16 वर्ष महिला
- मृत्यू
- अलमास - वय वर्ष 15 महिला