मुंबई : मुंबई उपनगरातील गोरेगाव पश्चिमेकडील एका सरकारी बँकेतील (Government Bank of Goregaon West in Mumbai) एक कोटी 29 लाख रुपये ( One Crore 29 Lakhs in Government Bank ) बनावट कागदपत्रांच्या आधारे मृत व्यक्तीच्या खात्यात वळवले व ते पैसे विविध खात्यांमध्ये वळवून काढून घेतले. या फसवणूक प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी एक व्यक्तीस अटक केली असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत. परवेज शहा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
फसवणूक प्रकरणी सायबर सेलकडे एक तक्रार :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2022 मध्ये गोरेगाव मधील एका सरकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणी सायबर सेलकडे एक तक्रार झाली होती. या अर्जावरून गोरेगाव पोलिसांनी तपासास सुरुवात केली. बँकेत अज्ञात व्यक्तीने बनावट कागदपत्रांचा वापर करून एक खाते उघडले. ओव्हर ड्राफ्ट खात्यातून मोबाईल बँकिंगचा वापर करून 1 कोटी 29 लाख रुपये काढले गेले. ही सर्व रक्कम चांदिवली, मरोळ, पवई येथील खासगी बँकेच्या खात्यात जमा झाल्याने संशय बळावला. यामुळे बँकेने त्या खात्याची माहिती मागवली. यानंतर सोन बँकांनी माहिती देण्यास नकार दिल्याने ज्या खात्यात रक्कम जमा केली होती ती खाती फ्रिज केली.