मुंबई :अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस उपायुक्त प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक लता सुतार यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. घाटकोपर येथील खोकानी लेन रतनशी खिमजी वाडी येथून एकाला ड्रग्ज तस्करीप्रकरणी अटक केली. त्याच्याकडे १०० ग्रॅम एमडी ड्रग्ज आढळून आले.
४०५ ग्रॅम एमडी ड्रग्ज :त्याच्याकडे करण्यात आलेल्या पोलीस चौकशीत, नालासोपारा रेल्वे स्टेशन पूर्वेकडील भागात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज तस्करी करणाऱ्या नायजेरियन नागरिकांकडून एमडी आणल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे धाव घेत नायजेरियन नागरिकाला अटक केली. त्याच्याकडे ४०५ ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडून आला. दोघांनाही अमली पदार्थ तस्करीप्रकरणी अटक त्यांच्याकडून एकूण १ कोटी १ लाख किमतीचा ५०५ ग्रॅम एमडी साठा जप्त करत दुकलीला अटक करण्यास पथकाला यश आले आहे. दोघांना ७ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कुर्ला, धारावीसह विविध ड्रग्ज विक्री करण्यात आरोपी सक्रिय : नायजेरियन नागरिकासह अटक करण्यात आलेला ५८ वर्षीय मोहम्मद एजाज शेख ऊर्फ कालिया हा गेल्या काही वर्षांपासून ड्रग्ज तस्करीत सक्रिय आहे. त्याच्यावर विविध गुन्हे नोंद आहेत. नायेजरियन नागरिकांसोबत वसई, नालासोपारा, मीरा रोड भागात ड्रग्ज तस्करी करत होता. दोघेही धारावी आणि कुर्ला भागातही मोठ्या प्रमाणात सक्रिय होते. अमली विरोधी पथकानेही त्याच्यावर कारवाईही केली आहे. कालिया याचा मुलगा मोहम्मद नवाज हा डिसेंबर २०२० पासून न्यायालयीन कोठडीत आहे. आझाद मैदान पोलिसांनी त्याच्यावर २७५ ग्रॅम एमडीसह कारवाई केली होती.
जप्त ड्रग नष्ट : अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या या न्यायप्रविष्ठ गुन्ह्यातील जप्त अंमली पदार्थाची नाश प्रक्रिया राबविण्यात आली. केंद्र शासनाच्या अधिसूचनेतील तरतुदीनुसार २४२९ किलो ४२० ग्रॅम वजनाचा 'मेफेड्रॉन (एम.डी.)' हा अंमली पदार्थ शासन मान्यताप्राप्त 'सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट फॅसिलिटी'मध्ये भट्टीत जाळून नष्ट करण्यात आला आहे.
हेही वाचा :
- Spanish Woman Molesting Case: स्पॅनिश पर्यटक महिलेचा विनयभंग करणाऱ्या मॅनेजरला दोन वर्षांचा कारावास
- MD Drugs Destroyed : ४८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे एमडी ड्रग्ज नष्ट, अंमली पदार्थ विरोधी कक्षाची कार्यवाही
- Boyfriend Attacked On Girlfriend: रात्र झाल्याने ती घराकडे निघाली, पण प्रियकराने अडविले; वाद अन् थेट...