महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक! शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एकाने घेतले पेटवून - शिवाजीनगर पोलीस

रिजवान अब्दूल हमीद जमादार (वय-४४) असे पेटवून घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गोवंडी येथील रहिवासी जमादार याने मंगळवारी दुपारी पोलीस ठाण्याच्या आवारात आला होता. यावेळी ही घटना घडली.

संग्रहीत

By

Published : Oct 1, 2019, 8:27 PM IST

मुंबई -शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या आवारात एकाने स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेतल्याची घटना घडली आहे. यासंबंधीचे कारण अद्याप अस्पष्ट
आहे.

हेही वाचा - वाशीत तरुणावर ५ जणांचा अनैसर्गिक अत्याचार, प्रकृती चिंताजनक

रिजवान अब्दूल हमीद जमादार (वय ४४), असे पेटवून घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो मंगळवारी दुपारी पोलीस ठाण्याच्या आवारात आला होता. बराच वेळ इकडे तिकडे रेंगाळल्यानंतर अचानक ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून त्याने स्वतःला पेटवून घेतले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करीत करीत आहेत.

हेही वाचा - भंडारा: तुमसरमध्ये गँगवर; एक गुंडांची हत्या, आरोपी फरार

ABOUT THE AUTHOR

...view details