मुंबई - चित्रपटात नेहमीच म्हटले जाते की, 'कानून के हाथ लंबे होते है' मात्र हाच डायलॉग मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा (क्रमांक ९) च्या पथकाने खरा ठरवला आहे. बनावट भारतीय चलनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या व जामिनावर सुटून फरार झालेल्या आरोपीला तब्बल ३५ वर्षानंतर मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा - भिवंडीत विवाहितेवर दिरासह ४ जणांचा बलात्कार; नराधम अटकेत
१९८५ साली मुंबईतील सहार पोलीस ठाण्याच्या अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान बनावट भारतीय चलनी नोटांचे वितरण करण्याच्या तयारीत असलेल्या अकरा जणांच्या टोळीला अटक करण्यात आली होती. टोळीतील एक इब्राहिम कल्लू मन्सूरी हा आरोपी जामिनावर सुटल्यानंतर फरार झाला होता. बनावट नोटांच्या गुन्ह्यासंदर्भात गेली ३५ वर्षे हा आरोपी फरार असल्यामुळे त्याचा शोध सुरू होता.
हेही वाचा - ताम्हिणी घाटातील दुहेरी खुनाचे गूढ अखेर उकलले, खवल्या मांजराच्या तस्करीतून मित्रांनीच संपवल्याचे निष्पन्न
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा (क्रमांक ९) च्या पथकाने केलेल्या कारवाईत गुजरातमधील टोकायरी येथील बदरापूर येथून आरोपीला अटक केली आहे. आरोपी इब्राहिम हा फरार झाला होता, त्यावेळी 28 वर्षांचा होता. मात्र तब्बल 35 वर्षांनंतर 63 वर्षाचा झाला आहे. अटक आरोपीला फेरअटकेसाठी पुन्हा सहार पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.