मुंबई :शहरातून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या घाटकोपर कक्षाने ही कारवाई केली आहे. या कारवाईत माझगाव येथून ४० लाखांहून अधिक रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले आहे. तसेच एका व्यक्तीला अटक केली आहे.
40 लाखांहून अधिक रूपयांचे ड्रग्ज जप्त : काल सकाळी ८.१५ ते १०.४५ वाजण्याच्यादरम्यानडॉकयार्ड रेल्वे ब्रिज खाली, फरहान बिस्कीट स्टोअर्स, शॉप नं. ए-१ चे बाजुला असलेल्या दादन बिल्डींग नवानगर, डॉकयार्ड रोड, माझगाव येथे एक संशयित व्यक्ती त्याचे अस्तित्व लपवुन वावरताना आढळून आला. पोलीस पथकास पाहताच तो पळून जावू लागला म्हणून त्यास पोलीस पथकाने जागीच घेराव घालून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून २२० ग्रॅम "एम.डी. (मेफेड्रॉन) जप्त केले. या अंमली पदार्थाची किंमत अंदाजे ४४ लाख इतकी आहे.
आरोपीला पोलिस कोठडी : एन.डी.पी.एस. कायदा १९८५ प्रमाणे गुन्हा नोंद करून या आरोपीला गुन्हयात अटक करण्यात आली आहे. आरोपीने त्याचे ताब्यातील अंमली पदार्थ कोणाकडून आणले याबाबत तपास चालू आहे. अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पथकातील सहभागी अधिकारी :ड्रग्ज जप्तीच्या कारवाईत अटक केलेला आरोपी हा अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कौशल्यपूर्ण कामगिरीमुळे अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या तावडीत मिळून आला. या गुन्हयाचा तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राघवेंद्र लोंढे हे करीत आहेत. हि यशस्वी कामगिरी विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई,देवेन भारती, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, लखमी गौतम, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), प्रकाश जाधव, पोलीस उप आयुक्त, अमली पदार्थ विरोधी कथा, मुंबई, सावळाराम आगवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या घाटकोपर युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक लता सुतार यांचे नेतृत्वात अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राघवेंद्र लांडे, पोलीस उप निरीक्षक सचिन पालवे,पोलीसउप निरीक्षक नागेश चिकणे, पोलीस हवालदार गोरे, म्हात्रे, पोलीस शिपाई शिंदे आणि डुंबरे, वाघ या पथकाने केली आहे.
हेही वाचा : Solapur Crime News : मालकाला अद्दल घडवण्यासाठी ड्रायव्हरने केली घरफोडी; 61 लाखांचा मुद्देमाल हस्तगत