महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sandeep Deshpande: संदीप देशपांडे हल्ल्याप्रकरणी भांडूप परिसरातून एकाला अटक - संदीप देशपांडे हल्ल्याप्रकरणी एकाला अटक

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तिसरा आरोपी ओंकार विकास चावरिया याला अटक केली आहे. त्याला भांडुप परिसरात अटक करण्यात आली. काही दिवसांपूर्वी देशपांडे यांच्यावर शिवजी पार्क येथे सकाळी हल्ला करण्यात आला आहे. त्यामध्ये ते मोठ्या प्रमाणात जखमी झाले होते.

Sandeep Deshpande
Sandeep Deshpande

By

Published : Mar 7, 2023, 10:45 PM IST

मुंबई :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर महाराष्ट्रात चांगलेच राजकारण तापलेले पाहायला मिळाले आहे. देशपांडे काही दिवसांपूर्वी सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना त्यांच्यावर शिवजी पार्क या परिसरात काही अज्ञातांनी पाठिमागून जिवघेना हल्ला केला. त्यामध्ये देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला चांगलाच मार लागला. त्यानंतर राजकारण मोठ्या प्रमाणात तापलेले पाहायला मिळाले. तसेच, ठाकरे गटावरही देशापांडे यांनी जोरदार टीका केली होती.

अज्ञातांनी हल्ला करत पळ काढला : संदीप देशपांडे हे मनसेचे माजी नगरसेवक आहेत. देशपांडे हे रोज सकाळी मुंबईतील दादर या परिसरात फिरायला जात असतात. ते नेहमीप्रमाणे फिरायला गेले असताना त्यांच्यावर या परिसरात काही लोकांनी टंपने पाठिमागून अचानक हल्ला केला. त्यामध्ये देशपांडे हे जखमी झाले आहेत. अचानक झालेल्या या हल्ल्यात देशपांडे यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते खाली कोसळे आणि त्यांच्यावर या अज्ञातांनी हल्ला करत पळ काढला. त्यानंतर देशपांडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ठाकरे गटावरही यावेळी मनसेकडून जोरदार हल्ला : देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर तत्काळ ही माहिती मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांना देण्यात आली. त्यानंतर अमित ठाकरे यांनी स्वत: गाडी चालवत संदीप देशपांडे यांना रुग्णालयात दाखल केले. यावेळी स्वत: राज ठाकरेही उपस्थित होते. यावेळी मनसेचे इतरही पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, हा हल्ला कोणत्या गटाकडून करण्यात आला आहे यावर मोठी राजकीय खलबत सुरू होती. याचवेळी ठाकरे गटावरही यावेळी मनसेकडून जोरदार हल्ला चढवला आहे.

हेही वाचा :जम्मू-काश्मिरच्या वादापेक्षा उदयनराजेंच्या पेंटिंगचा वाद गहण; आमदार शिवेंद्रराजेंची उपरोधिक टीका

ABOUT THE AUTHOR

...view details