मुंबई -ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून ग्राहकांना महागड्या ब्रँडच्या बनावट वस्तू विकणाऱ्या आरोपींची संख्या वाढत आहे. नामांकित कंपन्यांच्या नावाखाली बनावट घड्याळे तयार करून त्यांची ऑनलाईन विक्री करणाऱ्या कारखान्यावर मुंबई पोलिसांनी छापा टाकला.
बनावट घड्याळे तयार करून त्यांची ऑनलाइन विक्री करणाऱ्या कारखान्यावर मुंबई पोलीसांनी छापा टाकला
मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट 3 ने केलेल्या कारवाईत एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत २० लाख रुपये किमतीची बनावट घड्याळे जप्त करण्यात आली.
हेही वाचा - ऑईल टँकरमधील पेट्रोल चोरून पाणी भरणाऱ्या ३ आरोपींना पोलिसांनी केले गजाआड
मुंबईतील मस्जिद बंदर येथील एका कारखान्यात नामांकित विदेशी कंपन्यांची नावे वापरून बनावट मनगटी घड्याळे तयार केली जातात. ही माहिती क्राईम ब्रँच युनिट 3 ला मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी मस्जिद बंदर येथील काजी सय्यद स्ट्रीट येथील खोली क्रमांक 206 वर छापा मारला.
पोलिसांनी घटनास्थळावरून केलवीन केलीन, मोवाडो स्वीस, फास्ट ट्रॅक या कंपन्याची 4108 बनावट घडयाळे हस्तगत केली. ही घड्याळे ब्रँडेड असल्याचे भासवून त्यांची ऑनलाईन विक्री करण्यात येत होती.