मुंबई- लोकलमध्ये मुलीची छेडछाड करणाऱ्या एका व्यक्तीला पीडित मुलीनेच चांगलाच चोप दिल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. चेंबूर रेल्वे स्थानकावर हा प्रकार समोर आला. या व्यक्तीला रेल्वे पोलिसांनी अटक करून त्याच्यावर छेडछाडीचा गुन्हा दाखल केला आहे. राजेश दामोदर गिरी, असे या आरोपीचे नाव आहे.
हेही वाचा - प्रियकराच्या मदतीने वडिलांचा खून, सुटकेसमध्ये आढळले होते अवयव
या आरोपीने मुलीची एक वेळी नाही तर, तब्बल 3 वेळा छेड काढली. त्यामुळे पीडित मुलीला राग अनावर झाला त्यामुळे तरूणीने आरोपीला चप्पलने मारण्यास सुरुवात केली. ही घटना आज सकाळी 9 वाजता घडली. पीडित मुलगी ही आपल्या काही मैत्रीणी आणि मित्रांसह कुर्ला स्टेशनवरून ट्रेन मध्ये चढली. त्याचवेळी आरोपीने मुलीची छेड काढली. मात्र, मुलगी काही बोलू शकली नाही. नंतर पुन्हा तरूणी उतरत असतानाही आरोपीने तिची छेड काढली. त्यावेळी तरूणीने आरोपीला चांगलाच धडा शिकवला.
अन् 'तिने' शिकवला छेड काढणाऱ्यास चांगलाच धडा हेही वाचा - चुनाभट्टी पोलीस ठाण्यासमोरील ठिय्या आंदोलन आमदारांच्या मध्यस्थीने मागे
आरोपी हा चेंबुरचा रहिवासी असून त्याच्यावर मारामारीचे आणखी गुन्हे दाखल आहेत. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत असून महिला किंवा मुलींसोबत जर असे काही घडत असेल किंवा कोणी छेडछाड करत असेल तर, त्वरित पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.