मुंबई- ठाणे , मुंबई, पालघर व रायगड जिह्यातून तब्बल 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेल्या 19 वर्षीय आरोपीला वडाळा रेल्वे स्थानकावर जीवघेणा रेल्वे स्टंट करताना वडाळा जीआरपी पोलिसांनी अटक केली आहे. स्टंटचा प्रकार वडाळा रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
8 फेब्रुवारीला मुंबईतील वडाळा रेल्वेस्थानाकाच्या फलाट क्रमांक 1 वर गोरेगावहून आलेल्या मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये महिलांच्या आरक्षित डब्याच्या शेजारी असलेल्या मालवाहतूकीच्या डब्यातून राहुल चव्हाण हा रेकॉर्डवरील आरोपी स्टंट करत होता. रेल्वे स्थानकावर गस्तीवर असलेल्या जीआरपी पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून या युवकाला रेल्वे स्थानकावर वडाळा जीआरपी पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली.