मुंबई : अटक आरोपीविरुद्ध लैंगिक शोषणाच्या किमान 326 तक्रारी दाखल आहेत. ज्यांचा अधिक तपास केला जात आहे. पोलिसांनी पुढे सांगितले की, मुंबई गुन्हे शाखा या संशयिताबाबत मिळालेल्या माहितीवर काम करत आहे. सोशल मीडिया, वेबसाइटद्वारे ऑनलाइन वेश्या व्यवसाय सर्व्हिस ऑफर करून त्यांने अनेकांची फसवणूक केली होती. ग्राहकांचे व्हिडिओ रेकॉर्ड करुन आरोपीने अनेकांना ब्लॅकमेल केले आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
आरोपीला बेड्या :याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, पीडितेने गेल्या वर्षी पूर्व उपनगरातील अँटॉप हिल पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. तेव्हापासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. मुंबई गुन्हे शाखेच्या सापळ रचत आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. 26 जानेवारीला पोलीस अधिकाऱ्यांना संशयित घाटकोपर परिसरात भेटण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्याला घाटकोपरच्या असल्फा परिसरातून पकडले अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपीवर देशातील विविध भागांमध्ये किमान 39 गुन्हे दाखल आहेत. ज्यात तेलंगणातील 35, झारखंडमधील 2, महाराष्ट्रातील 1 दिल्लीतील एका प्रकणाचा समावेश आहे.