महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Gun Firing On BMC Contractor Car in Mumbai : मुंबई महापालिकेच्या कंत्राटदाराच्या कारवर गोळीबार; हल्लेखोर फरार

सोमवारी रात्री कुर्ला उपनगरात दोन अज्ञात व्यक्तींनी मुंबई महापालिकेच्या कंत्राटदाराच्या कारवर गोळीबार (Contractor Car Firing Mumbai) केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला (case filed in firing case) आहे. गोळीबारात गोळी कारच्या ड्रायव्हरच्या बाजूच्या दरवाजाला लागली आहे. (Latest news from Mumbai) पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कारमध्ये असलेल्या कंत्राटदाराला कोणतीही दुखापत झालेली नाही. (Mumbai Crime)

Gun Firing On BMC Contractor Car in Mumbai
कंत्राटदाराच्या कारवर गोळीबार

By

Published : Jan 10, 2023, 5:37 PM IST

Updated : Jan 10, 2023, 8:20 PM IST

मुंबई :सूरज प्रतापसिंह असे कंत्राटदाराचे नाव असून या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले आहेत. या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. (Latest news from Mumbai) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज प्रतापसिंह हे काम संपवून त्यांच्या घरी जात होते. ते कुर्ल्यातील कपाडीया नगर येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कंत्राटदार म्हणून काम करतात. (Mumbai Crime) कुर्ल्याहून ते बोरीवलीला असलेल्या आपल्या राहत्या घराच्या दिशेने गाडीतून जात असताना कपाडीया जंक्शनजवळ त्यांची गाडी पोहोचताच दोन अज्ञात हल्लेखोरांनी सूरज प्रतापसिंह यांच्या गाडीवर गोळीबार (Contractor Car Firing Mumbai) केला. काही राऊंड फायर केल्यावर दोन्ही हल्लेखोर हे गाडीवरून घटनास्थळावरून फरार झाले. (case filed in firing case) सूरज प्रतापसिंह आणि त्यांचा ड्रायव्हर दोघेही सुखरुप आहेत.

पोलिसात तक्रार दाखल :या घटनेनंतर सूरज प्रतापसिंह यांनी कुर्ला पोलीस स्थानक गाठून तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. तसेच या प्रकरणाचा तपास देखील सुरू केला आहे. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरुन हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.

धाक निर्मितीसाठी गोळीबार :फेरीवाल्यांकडून खंडणी वसूल करण्यासाठी गोळीबार करण्यात आल्याची घटना मुंबईतील खार पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली होती. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने एका आरोपीला अटक केली आहे. शारिक शेख असे अटक आरोपीचे नाव होते. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तिंविरोधात गुन्हा दाखल केला होता.

खंडणीचा होता उद्देश : खार लिंकिंग रोडवरील गॅझेबो शॉपिंग सेंटरच्या बोर्डावर अज्ञात व्यक्तींनी हवेत गोळीबार केला होता. सुदैवाने गोळीबारात कोणीही जखमी झालेले नव्हते. याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला. शिंगे यांनी सांगितले की, आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्कुटी देखील जप्त करण्यात आली असून अन्य तीन सहआरोपींचा शोध सुरू आहे. या आरोपींच्या गोळीबारामागे फेरीवाल्यांना भयभीत करून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा उद्देश असल्याचे तपासात उघड झाले होते.

Last Updated : Jan 10, 2023, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details