मुंबई -टिकटॉकसारख्या सोशल माध्यमांवर प्रसिद्ध होण्यासाठी धावत्या रेल्वेमध्ये जीवघेणे स्टंट करणे तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. स्टंट करणाऱ्या फैजान इस्माईल शेख (30) या तरुणाला वडाळा रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. तसेच धावत्या लोकलमध्ये या तरुणाचा व्हिडिओ चित्रित करणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला पोलिसांनी समज देऊन सोडले आहे.
रेल्वेत जीवघेणे स्टंट करणे पडले महागात; एका आरोपीला अटक - फैजान इस्माईल शेख
स्टंट करणाऱ्या फैजान इस्माईल शेख (30) या तरुणाला वडाळा रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, धावत्या लोकलमध्ये या तरुणाचा व्हिडिओ चित्रित करणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला पोलिसांनी समज देऊन सोडले आहे. गोवंडी ते टिळकनगर या स्थानकादरम्यान नेहमीच स्टंट करत असल्याची कबुली आरोपीने दिली आहे.
हेही वाचा - पुणे रेल्वे स्थानकावरून 22 लाख रुपये किमतीचे चरस जप्त; एकाला अटक
गेल्या काही दिवसांपासून सोशल माध्यमांवर धावत्या लोकलमध्ये दारात उभे राहून स्टंट करणारा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यासंदर्भात वडाळा रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. हा व्हिडीओ टिळकनगर ते गोवंडी रेल्वे स्थानकादरम्यान चित्रित करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. पोलिसांनी रेल्वेस्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास सुरू केला होता. तपासाअंती आरोपी मुंबईतील गोवंडी परिसरातील बैगनवाडी येथील झोपडपट्टीत राहत असल्याचे समोर आले. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारावर त्याला अटक केली आहे. दरम्यान, गोवंडी ते टिळकनगर या स्थानकादरम्यान नेहमीच स्टंट करत असल्याची कबुली आरोपीने दिली आहे.