मुंबई -पाणीपुरवठा करणाऱया पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिम मधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून ( Department of Water Engineers ) करण्यात येणार आहे. या कामासाठी दिनांक १ ते १० नोव्हेंबर २०२२ या कालावधीमध्ये पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणी कपात करण्यात येणार असल्याची माहिती, बृहन्मुंबई महानगरपालिका ( Brihanmumbai Municipal Corporation ) प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Mumbai : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, मुंबईत या दिवशी होणार पाणी कपात, वाचा - on this day water cut in Mumbai
पाणीपुरवठा करणाऱया पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिम मधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून ( Department of Water Engineers ) करण्यात येणार आहे. या कामासाठी दिनांक १ ते १० नोव्हेंबर २०२२ या कालावधीमध्ये पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणी कपात करण्यात येणार असल्याची माहिती, बृहन्मुंबई महानगरपालिका ( Brihanmumbai Municipal Corporation ) प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

१० टक्के पाणीकपात - बृहन्मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱया पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिम मधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम मंगळवार १ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर २०२२ पर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या तातडीच्या दुरुस्ती कामामुळे मुंबईमधील व बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱया पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
काटकरीने पाणी वापरण्याचे आवाहन - सदर दुरुस्ती कामाच्या कारणास्तव मंगळवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२२ ते गुरुवार, दिनांक १० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत मुंबई महानगरात व बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यात देखील १० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. यासाठी सर्व नागरिकांनी पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.