मुंबई - बेस्ट वर्कर्स युनियन आणि कृती समितीने पुन्हा एकदा संपाचे हत्यार उगारले आहे. येत्या 9 ऑक्टोबरला बेस्ट कामगार संपावर जाणार आहेत. कृती समितीने सादर केलेल्या मागणी पत्राची पूर्तता न झाल्यास हा संप केला जाणार आहे.
बेस्ट वर्कर्स युनियन आणि कृती समितीने पुन्हा उगारले संपाचे हत्यार - कामगार नेते शशांक राव
येत्या 9 ऑक्टोबरला बेस्ट वर्कर्स युनियन आणि कृती समिती कामगार संपावर जाणार आहेत. कृती समितीने सादर केलेल्या मागणी पत्राची पूर्तता न झाल्यास हा संप केला जाणार आहे.
हेही वाचा -महाराष्ट्र की गुजरात एक नंबरवर ? मोदींनी जाहीर करावे - नवाब मलिक
शिवसेनेने काही दिवसांपूर्वी एमओयु संदर्भातली केलेली घोषणा मराठी कामगार हद्दपार करणारी असून सेनेची यात दुटपी भूमिका असल्याचा आरोप कामगार नेते शशांक राव यांनी केला आहे. बेस्ट वर्कर्स युनियनसोबत वाटाघाटी करून अंतिम करार करावा, बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांना अंतरिम मासिक 10 हजार रुपये वाढ द्यावी, बेस्ट उपक्रमाचा 'क' अर्थसंकल्प पालिकेच्या 'अ' अर्थसंकल्पात विलीन करण्यात यावा आणि बेस्ट समिती व पालिकेच्या सभेत झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करावी, अशा विविध मागण्या कामगार करत आहेत.