मुंबई : मुंबईतील पवई जलाशयाच्या पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनवर गळती दुरुस्तीचे तसेच वेरावली जलाशय १ व २ साठी नवीन पाईपलाईन जोडणीसाठी २९ व ३० नोव्हेंबर रोजी दुरुस्ती काम केले जाणार आहे. या कालावधीत मुंबईत काही विभागात पाणी पुरवठा बंद ( Water supply stopped in some place of Mumbai ) राहणार आहे. तर काही विभागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. या कालावधीत टेकडीवर आणि डोंगराला भागात राहणाऱ्या नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. नागरिकांनी यावेळी पाणी जपून वापरावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने ( Brihanmumbai Municipal Corporation ) केले आहे.
या विभागात पाणी बंद -बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पवई जलाशयाच्या १२०० मिलीमीटर आगम वाहिनीवरील ३०० मिलीमीटर बायपास जल वाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम, तसेच वेरावली जलाशय १ व २ साठी १८०० मिलीमीटर व्यासाची नवीन वाहिनीच्या (इनलेट) जोडणीसाठी मंगळवार, २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेपासून बुधवार, दिनांक ३० नोव्हेंबर सकाळी ८.३० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत म्हणजेच मंगळवार, दिनांक २९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपासून बुधवार, दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत के/पूर्व, एच/पूर्व, एच/पश्चिम, पी/दक्षिण, एस, एल आणि एन या विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा खंडित राहील.