महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Omicron Patients in Mumbai : मुंबईत ओमायक्रॉन विषाणूचे ११ नवे रुग्ण, रुग्णांचा आकडा ८५वर

मुंबई विमानतळावर अति जोखमीच्या देशातून १२,६४० प्रवासी आले. त्यापैकी ७४ प्रवासी विमानतळावरच्या चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. १ नोव्हेंबरपासून परदेश प्रवास केलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यात १४६ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सोमवारी मुंबईत ११ प्रवाशांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले आहे. ( Omicron News Mumbai )

Omicron Patients in Mumbai
मुंबई ओमायक्रॉन

By

Published : Dec 28, 2021, 1:30 AM IST

Updated : Dec 28, 2021, 12:41 PM IST

मुंबई - एकीकडे मुंबईत कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असताना नवीन व्हेरियंट असलेल्या ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून येत आहेत. ( Mumbai Omicron Cases Increased ) मुंबईत परदेश प्रवास केलेले ११ प्रवासी विमानतळावरील चाचण्यांमध्ये ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे मुंबईमधील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ८५ झाली आहे. त्यापैकी ४४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. ( BMC on Omicron Patients Mumbai )

रुग्णांचा आकडा ८५वर -

मुंबई विमानतळावर अति जोखमीच्या देशातून १२,६४० प्रवासी आले. त्यापैकी ७४ प्रवासी विमानतळावरच्या चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. १ नोव्हेंबरपासून परदेश प्रवास केलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यात १४६ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोना बाधितांच्या अतिजोखमीचे सहवासातील २२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोनाबाधित प्रवाशांचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही, पुणे) येथे जीनोम सिक्वेंसिंग चाचणीसाठी पाठविण्यात आले. त्यात आतापर्यंत ८५, (४८ पुरुष, ३७ स्त्री) जणांना ओमायक्रॉन कोविड विषाणू प्रकाराची बाधा झाल्याचा अहवाल महानगरपालिका प्रशासनाला प्राप्त झाला आहे. एकूण ७५ पैकी ४५ रुग्ण मुंबईबाहेरील आहेत.

हेही वाचा -पुढील महिन्यात ओमायक्राॅन रुग्ण व मृत्यूत वाढ होण्याची भीती; ३५ हजार बेड्स अॅक्टिव्ह

नागरिकांनी भीती बाळगू नये -

विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून याबाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोरोना अनुरुप वर्तनाचा अंगिकार करावा, नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत, त्यांनीही आपल्याबाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने सर्व जनतेला करण्यात आले आहे.

पालिका आयुक्त म्हणाले...

मुंबईत गेले पावणेदोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. कोरोनाचा प्रसार असताना त्याचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. ओमायक्राॅन व्हेरिएंट घातक नसला तरी त्याचा प्रसार झपाट्याने होत आहे. पुढील महिन्यात ओमायक्राॅनच्या रुग्णसंख्येत आणि मृत्यूमध्ये वाढ होण्याची चिंता पालिकेच्या आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे, मुंबईकरांसाठी जानेवारी महिना टेंशनचा असणार आहे. ओमायक्राॅनचे रुग्ण वाढल्यास त्यांच्यावर उपचार करता यावेत म्हणून कोरोना केअर सेंटर १ व २ मध्ये तब्बल ३५ हजार बेड्स अॅक्टिव्ह ठेवण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

हेही वाचा -Anger of Matang community : मातंग समाजाचा विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर आक्रोश

ओमायक्रॉनविरोधात पालिका सज्ज -

मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. गेल्या पावणे दोन वर्षांत कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या. आता कोरोनाच्या ओमायक्रॉन या व्हेरिएंटमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. याच व्हेरिएंटमुळे भारतात तिसरी लाट येईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. आतापर्यंत मुंबईत ओमायक्राॅनचे ८५ रुग्ण आढळले आहेत. या सर्व रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. यामुळे ओमायक्राॅन विषाणू घातक नसला तरी, त्याचा झपाट्याने प्रसार होत असल्याने मुंबई महापालिका ओमायक्राॅन विषाणू विरोधात सज्ज झाली आहे.

३५ हजार बेड्स अॅक्टिव्ह -

ओमायक्राॅनचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याने पुढील महिन्यात रुग्णसंख्या आणि मृत्यूमध्ये वाढ होण्याची भीती पालिकेने व्यक्त केली आहे. यामुळे ओमायक्राॅनचा प्रसार वेळीच रोखता यावा, रुग्णांवर वेळीच उपचार करता यावे, यासाठी कोरोना केअर सेंटर १ व २ मध्ये तब्बल ३५ हजार २८ बेड्स अॅक्टिव्ह करण्यात आल्याचे काकाणी यांनी सांगितले. तसेच, बाधितांना लागणारी औषधे, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी लागणारी सामग्री याची योग्य ती तयारी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. ख्रिसमस, थर्टी फर्स्ट, नव वर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर मुंबईत गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, कोरोना केअर सेंटरमधील बेड्स अॅक्टिव्ह ठेवण्यात आले आहेत.

सध्या कोरोना केअर सेंटरमधील बेड्स -

१२९ कोरोना केअर सेंटर १ मध्ये २२,३७८ बेड्स

सध्या उपचार घेणारे रुग्ण - ५३१

९८ कोरोना कोरोना केअर सेंटर २ मध्ये १२,६५० बेड्स

सध्या उपचार घेणारे रुग्ण - ४२

मुंबईत एकूण अॅक्टिव्ह रुग्ण - ४,२९५
यात लक्षणे नसलेले - २,३१९
लक्षणे असलेले रुग्ण - १,८३९
गंभीर (क्रिटिकल) असलेले रुग्ण - १३७

Last Updated : Dec 28, 2021, 12:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details