महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेण्यासाठी आलेल्या वृद्धाचा मृत्यू - gajanan maljalkar death mumbai marethon

मॅरेथॉन स्पर्धेत ज्येष्ठ नागरिकांसाठीसुद्धा वेगळी स्पर्धा असते. यामध्ये सहभागी होण्यासाठी मालजलकर नालासोपरावरून आले होते. मालजलकर हे कॅनारा बँकेचे निवृत्त कर्मचारी असून गेल्या ४ वर्षांपासून ते या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येत होते. स्पर्धेदरम्यान मालजलकर यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना जवळच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला.

mumbai
गजानन मालजलकर

By

Published : Jan 19, 2020, 2:45 PM IST

मुंबई- शहरात आज टाटा मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. मात्र, या स्पर्धेला गालबोट लागले आहे. स्पर्धेत भाग घेतेलेले ६४ वर्षीय गजानन मालजलकर यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. मालजलकर आपल्या ग्रृपसह या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आले होते. गेल्या चार वर्षांपासून ते या स्पर्धेत भाग घेत होते.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

मॅरेथॉन स्पर्धेत ज्येष्ठ नागरिकांसाठीसुद्धा वेगळी स्पर्धा असते. यामध्ये सहभागी होण्यासाठी मालजलकर नालासोपरावरून आले होते. मालजलकर हे कॅनारा बँकेचे निवृत्त कर्मचारी असून गेल्या ४ वर्षांपासून ते या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येत होते. स्पर्धेदरम्यान मालजलकर यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना जवळच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, शहरात कडाक्याच्या थंडीत १७ व्या टाटा मॅरेथॉन स्पर्धेला आज सकाळी ५.१५ वाजता सुरुवात झाली होती. या स्पर्धेत देश-विदेशातील एकूण ५५ हजार ३२२ धावपटू सहभागी झाले होते.

हेही वाचा-राज्यात लवकरच अंगणवाडी सेविकांच्या ६ हजार ५०० पदांची भरती

ABOUT THE AUTHOR

...view details