मुंबई - राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या ( Maharashtra Winter Session 2021 ) दुसऱ्या दिवशी ओबीसी आरक्षणासाठी प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar Protest Obc Reservation ) यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीने ( Vanchit Bahujan Aghadi ) विधानभवनावर मोर्चा काढला. यावेळी, ओबीसींना आरक्षण ( Obc Reservation ) मिळावे या मागणीने कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
लढा गावपातळीवर नेणार
विधानभवनावर काढलेल्या मोर्चावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar Protest Obc Reservation ) म्हणाले की, ओबीसींना राजकीय आरक्षण मिळायला हवे. ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. एकदा जनगणना केली तर राजकीय आरक्षणही आपोआप मिळेल. पण, केंद्र आणि राज्य सरकारला ओबीसींना आरक्षणच ( Central And State Government Obc Reservation ) द्यायचे नाही. मंडल आयोगापेक्षाही आता मोठी लढाई असेल. आम्ही हे आंदोलन थांबवणार नसून, राज्यभरात घेऊन जाऊ. तालुका आणि गावपातळीपर्यंत ही लढाई लढली जाईल, असे स्पष्ट करत सरकारने केवळ ओबीसीच नव्हे मराठा आरक्षणाचंही वाटोळं केल्याचा आरोप त्यांनी केला.