मुंबई OBC leader Prakash Shendge : प्रकाश शेंडगे आज (बुधवारी) मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मराठा समाजाला सुविधा, लाभ मिळाले आहेत, ते ओबीसींनाही मिळाले पाहिजेत. (Kunbi certificate for Marathas) मराठा समाजाला अनेक बाबतीत सुविधा देण्यात आल्या आहेत. अनेक कोटी रुपये या समाजासाठी देण्यात आले आहेत. मराठा समाज हा मागासलेला नाही. त्यांनी आंदोलन करताना जाळपोळ करणे उचित नाही. त्यामुळं आंदोलनाला हिंसक वळण लागले. शिंदे समितीला असा कुठलाही कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अधिकार नाही. न्यायालयानंसुद्धा म्हटलं आहे की, मराठा समाज मागासलेला नाही. (Maratha reservation issue) आमची संख्या ३२ टक्के आहे. यात अनेक जाती आहेत. मराठा समाजाने सामोपचारी भूमिका घेतली पाहिजे. दिवाळीनंतर आम्ही याविरोधात आंदोलन करणार असं देखील शेंडगे म्हणाले. छगन भुजबळ आमचे समर्थक आहेत. त्यांना लक्ष्य करणं चुकीचं आहे. आम्ही भुजबळ साहेबांच्या पाठीशी आहोत. आम्ही लाठीची लढाई करणार नाही, पण न्यायालयीन लढाई लढू. आमचा ६० टक्के मतदार आहे. हम भी किसीसे कम नहीं है, हे दाखवून देऊ, असं प्रकाश शेंडगे म्हणाले.
तर आम्ही न्यायालयीन लढाई लढू:मराठा समाजाने समोपचारी भूमिका घेतली पाहिजे. दिवाळीनंतर आम्ही याविरोधात आंदोलन करणार असं देखील शेंडगे म्हणाले. छगन भुजबळ यांना आमचे समर्थन आहे. भुजबळ यांना लक्ष्य करणं चुकीचं आहे. आम्ही भुजबळांच्या पाठीशी आहोत. आम्ही लाठीची लढाई करणार नाही; पण न्यायालयीन लढाई लढू. आमचा ६० टक्के मतदार आहे. हम भी किसीसे कम नहीं है, हे दाखवून देऊ, असं ओबीसी नेते प्रकाश शेंडगे म्हणाले.