मुंबई : राज्यातील ओबीसी समाजाचा माजी मंत्री विजय वडेट्टीवार ( Former Minister Vadettiwar ) यांनी वाटोळ केले आहे. वडेट्टीवार यांच्यासारखे मंत्री पुन्हा ओबीसी समाजाला लाभू नये, याकरिता आम्ही प्रार्थना देखील करणार आहे, अशी घनाघाती टीका ओबीसी समाजाचे नेते अण्णा शेंडगे यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये 10 नोव्हेंबर रोजी ओबीसी समाजाच्या जनगणनेकरिता तसेच इतर मागण्यांकरिता ओबीसी आक्रोश मोर्चा निघणार असल्याची माहिती ओबीसी नेते अण्णा शेंडगे (OBC leader Anna Shendge ) पत्रकार परिषदेत यांनी दिली आहे.
कुठल्याही सरकारचा पुढाकार नाही - महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात ओबीसी समाजाची दयनीय अवस्था झाली होती. ओबीसी समाजाचे सरकारमधील असलेले माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी संपूर्ण वाटोळ केले आहे. या संदर्भातील अनेक मागण्या त्यावेळी आम्ही सरकारकडे केल्या होत्या, मात्र सरकारने कुठलीही भूमिका घेतली नव्हती. मात्र कालांतराने सरकार कोसळले आणि शिंदे सरकार अस्तित्वात आले. पण तरी देखील ओबीसी समाजाच्या मागण्यांकरिता अद्यापही कुठलेही सरकार पुढाकार घेताना दिसत नसल्याची खंत देखील ओबीसी नेते अण्णा शेंडगे यांनी व्यक्त केली आहे.
ओबीसी नेते अण्णा शेंडगे यांची पत्रकार परिषदेत विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका
ओबीसी समाजाच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात - ओबीसी समाजाचे जनगणना व्हावी तसेच ओबीसी समाजाचे इतर प्रलंबित प्रश्न देखील मार्गी लागावे, याकरिता केंद्र सरकार आणि सध्या राज्यात अस्तित्वात असलेले शिंदे फडणवीस सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते असताना ओबीसी समाजावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही,असे त्यांनी विधानभवनात अधिवेशनाकाळात म्हटले होते. मात्र चार महिने होऊन सुद्धा अद्यापही ओबीसी समाजा संदर्भात कुठलाही ठोस निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला नाही आहे.
मराठा आणि ओबीसी समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न - मराठा आणि ओबीसी समाजामध्ये मराठा समाजातील राजकीय नेते हे संम्रभ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. ओबीसी समाजाची नेहमीच मराठा समाजाच्या आरक्षणाकरता सकारात्मक भूमिका आहे. मात्र हे आरक्षण ओबीसी समाजाच्या आरक्षणांमधून देण्यात येऊ नये, यावर देखील ओबीसी समास्थाम आहे. मात्र काही मराठा समाजातील संघटना आणि मराठा नेते ओबीसी समाजामधील आरक्षणात मराठा समाजाला भागीदारी मिळवण्याची मागणी करत आहे. या संदर्भात शिंदे-फडणवीस सरकारने आपले भूमिका स्पष्ट कराला पाहिजे. ओबीसी समाजांना स्वतंत्र आरक्षण देण्यात येईल व ओबीसी समाजातील कुठलेही आरक्षण कमी करत मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार नाही, असे देवेंद्र फडवणीस यांनी त्यावळी म्हटले होते. आता त्यांनी यासंदर्भातील भूमिका स्पष्ट रूपात स्पष्ट केली पाहिजेत, ज्यामुळे ओबीसी समाज आणि मराठा समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही, असे देखील अण्णा शेंडगे यांनी म्हटले आहे.