महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pistachio Benefits For Health : शरीरातील अनावश्यक घटक कमी करायचे असतील तर दररोज पिस्ता खा-आहारतज्ज्ञांचा सल्ला - Health News

शरिराला आवश्यक असलेले घटक पिस्तामध्ये असतात. म्हणजेच जीवनसत्वे, खनिजे, प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स पिस्ता या सुकामेवामध्ये आढळतात. पिस्ता हा पदार्थ अँटिऑक्सिडंट आहे. त्याची माहती देण्यासाठी मुंबईत नुकतीच एक अमेरिकन पिस्ता उत्पादकांची कार्यशाळा पार पडली.

Pistachio Benefits For Health
पिस्ताचे महत्त्व आणि आरोग्यासाठी त्याच्या फायद्यांची माहिती

By

Published : Feb 19, 2023, 9:04 AM IST

पिस्ताचे महत्त्व आणि आरोग्यासाठी त्याच्या फायद्यांची माहिती

मुंबई : आरोग्य तंदुरुस्त ठेवायचे असेल आणि शरीरातील अनावश्यक घटक कमी करायचे असतील तर दररोज पिस्ता सेवन केले पाहिजे. पिस्ताचे दररोज सेवन केल्याने शरीराला अतिशय पोषक फायबर मिळते. तसेच जीवनसत्वे खनिजे कार्बोहायड्रेट्स मिळतात असा दावा स्तंभ लेखिका आणि आहार पोषणतज्ज्ञ नैनी सेटलवाड यांनी केला आहे. सर्व सुक्या मेव्यामधील पिस्ता हा एकमेव पदार्थ आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असा आहे. पिस्ता हा अतिशय पोषक आणि फायबर समृद्ध सुकामेवा आहे.


अमेरिकन पिस्ता उत्पादकांची कार्यशाळा : पिस्ता यामध्ये विविध प्रकारची जीवनसत्वे, खनिजे, प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स आढळतात. मात्र, अजूनही पिस्ता केवळ उच्चभ्रू लोकांचे खाणे आहे असा समज समाजामध्ये आढळतो. दरम्यान सुक्या मेव्याचे महत्त्व लोकांना समजावे तसेच तो सर्वसामान्य लोकांनाही सेवन करता येऊ शकतो. याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी तसेच पिस्त्यामधील विविध गुणधर्म लोकांना कळावेत यासाठी मुंबईत नुकतीच एक अमेरिकन पिस्ता उत्पादकांची कार्यशाळा पार पडली.



पिस्ता हे अँटिऑक्सिडंट सेटलवाड :पिस्ता हा पदार्थ अँटिऑक्सिडंट आहे. तो शरीरातील मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानीपासून निरोगी लोकांचे संरक्षण करण्यासाठी तसेच आपण सेवन केलेल्या अन्य पदार्थांमधून ऑक्सिडन्स दूर करण्यासाठी पिस्ता हे अतिशय महत्त्वाचे कार्यकर्ते करत असते. विशेषतः पिस्तामध्ये इतर सुक्या मेव्याच्या तुलनेत अत्यंत कमी कॅलरीज आढळतात. त्यामुळे रक्तातील साखरेने त्रस्त असलेल्या लोकांसाठी म्हणजेच मधुमेहग्रस्तांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

पिस्त्याच्या विविध उपयोगांविषयी माहिती :अमेरिकन पिस्ता उत्पादकांच्या या परिषदेत पिस्त्याच्या विविध उपयोगांविषयी माहिती सांगण्यात आली आहे. तसेच जागतिक बाजारपेठेत पिस्ता या सुक्या मेव्याला असलेली मागणी आणि मान्यता फार मोठी आहे. त्यावरही परिषदेत सविस्तर चर्चा करण्यात आली. उपयुक्त अशी चरबी फायबर आणि अन्य महत्त्वाचे घोषणासाठी आवश्यक असलेले घटक असतात. ज्यांची आपल्या शरीराला नित्यनेमाने आवश्यकता भासते पिस्ता हे दीर्घकाळ सुकामेवा असून जगभरात याला पसंती असल्याचे मत नैनी सेटलवान यांनी व्यक्त केले आहे. विद्यापीठात अलीकडे केलेल्या एका अभ्यासानुसार विस्तार उच्च एंटीऑक्सीडेंट क्षमता आहे. त्यामुळे ही क्षमता ब्लूबेरी डाळिंब रेड वाइन आणि चेरी यापेक्षा अधिक असल्याचा दावा सेटलवाड यांनी यावेळी बोलताना केला.

हेही वाचा :Tomato to Reduce Pimples : पिंपल्स कमी करण्यासाठी टोमॅटोचा करा 'असा' वापर; मिळवा झटक्यात रिझल्ट

ABOUT THE AUTHOR

...view details