मुंबई: शुक्रवारी कोरोनाच्या ३५२ नव्या रुग्णांची नोंद (new patients registered) झाली आहे. तर कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. आज २१३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ६४ हजार २७३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ४२ हजार ९१० रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १७९७ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ३३९६ दिवस इतका आहे. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०२१ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या ३५२ रुग्णांपैकी ३३७ म्हणजेच ९६ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ४८७ बेड्स असून त्यापैकी ६८ बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्क्याहुन अधिक बेड रिक्त आहेत.