मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात (Maharashtra including Mumbai) गेल्या काही दिवसात गोवर या आजारांचा प्रसार वाढू लागला आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षापेक्षा ५ पटीने गोवरच्या रुग्णांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मृत्यूच्या संख्येत गेल्या वर्षापेक्षा ४ पटीने तर, संशयित रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ (number of measles patients has increased) झाली आहे. राज्याप्रमाणे मुंबईमध्येही गेल्या वर्षापेक्षा १८ पटीने गोवरच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातही गोवरचा उद्रेक झाल्याचे समोर आले आहे. Measles Patients
राज्यात ५.४६ पटीने रुग्णसंख्या वाढली :मुंबईमध्ये सप्टेंबर महिन्यापासून ताप आणि लाल पुरळ आलेले रुग्ण आढळून येत आहेत. गोवरचा प्रसार मुंबईपुरता मर्यादित राहिला नसून; राज्यातही पसरला आहे. २०१९ मध्ये ताप आणि लाल पुरळ असलेले १३३७ संशयित रुग्ण आढळून आले होते. १५३ रुग्णांना गोवर झाला होता. तर ३ जणांचा मृत्यू झाला होता. २०२० मध्ये ताप आणि लाल पुरळ असलेले २१५० संशयित रुग्ण आढळून आले होते. १९३ रुग्णांना गोवर झाला होता तर ३ जणांचा मृत्यू झाला होता. २०२१ मध्ये ताप आणि लाल पुरळ असलेले ३६६८ संशयित रुग्ण आढळून आले होते. ९२ रुग्णांना गोवर झाला होता तर २ जणांचा मृत्यू झाला होता. २०२२ मध्ये त्यात वाढ होऊन ताप आणि लाल पुरळ असलेले ६४२१ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. ५०३ रुग्णांना गोवर झाला असून; आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. २०१९ च्या तुलनेत यंदा ३.३८ पटीने, २०२० मध्ये २.६० पटीने तर २०२१ च्या तुलनेत ५.४६ पटीने रुग्णसंख्या वाढली आहे.
राज्यात मृत्यूच्या संख्येत चार पटीने वाढ :महाराष्ट्रात २०१९ मध्ये गोवर या आजारामुळे ३ मृत्यू झाले होते. २०२० मध्येही गोवारमुळे ३ मृत्यू झाले. २०२१ मध्ये गोवरमुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये किंचित घट होऊन २ मृत्यूंची नोंद झाली होती. २०२२ मध्ये त्यात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन ८ मृत्यूची नोंद झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी मृत्यूच्या संख्येत चार पटीने तर त्याआधीच्या वर्षांच्या तुलनेत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे.
मुंबईत १८ पटीने वाढ :मुंबईमध्ये २०२० मध्ये गोवरचे २५ रुग्ण आढळून आले होते. २०२१ मध्ये रुग्णसंख्येत घट होऊन ९ रुग्णांची नोंद झाली होती. २०२२ मध्ये गोवरचा उद्रेक होऊन आतापर्यंत १६९ रुग्णांची नोंद झाली आहे. २०२० च्या तुलनेत यावर्षी ६.७६ पटीने तर २०२१ च्या तुलनेत १८.७७ पटीने गोवरच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मुंबईत यावर्षी ८ मृत्यूंचीही नोंद झाली आहे. मुंबईमध्ये २६२३ संशयित रुग्ण आढळून आले आहे. तर ३८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. १०५ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत, आणि २ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.