मुंबई- राज्यात गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोनाचा प्रसार सुरू झाला. आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाचा प्रसार कमी झाला होता. त्यात दोन महिन्यानंतर पुन्हा वाढ पाहायला मिळत आहे. राज्यात 11 डिसेंबरला 4268, 12 डिसेंबरला 4269, 16 डिसेंबरला 4304 रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर यात घट होऊन 2 ते 3 हजाराच्या आसपास रुग्ण आढळून येत होते. आता तब्बल दोन महिन्याने पुन्हा रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. आज 4092 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कालच्या पेक्षा आज 481 अधिक रुग्णांची वाढ झाली आहे. कमी होत असलेली रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे.
4092 नवीन रुग्ण -
महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत आजही वाढच; 40 मृत्यू
जवळपास दोन महिन्यानंतर पुन्हा रुग्णसंख्येचा आलेख चढता दिसत आहे. आज 4092 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कालच्या पेक्षा आज 481 अधिक रुग्णांची वाढ झाली आहे. कमी होत असलेली रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे.
आज राज्यात 4092 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 लाख 64 हजार 278 वर पोहचला आहे. तर आज 40 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 51 हजार 529 वर पोहचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 95.7 टक्के तर मृत्यूदर 2.5 टक्के आहे. राज्यात आज 1355 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 19 लाख 75 हजार 603 वर पोहचला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 53 लाख 21 हजार 608 नमुन्यांपैकी 20 लाख 64 हजार 278 नमुने म्हणजेच 13.47 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 74 हजार 243 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 35 हजार 965 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
या दिवशी सर्वात कमी रुग्णांची नोंद -
राज्यात गेल्या दहा महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. या कालावधीत राज्यात 15 नोव्हेंबरला 2 हजार 544, 18 जानेवारीला 1 हजार 924 तर 25 जानेवारीला 1 हजार 842 इतके सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.